*जिल्‍हा परिषदे अंतर्गत येत्‍या 10 जूनपर्यंत पदोन्‍नत्‍या* *मुख्‍य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांची माहिती* - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers


Monday, May 31, 2021

*जिल्‍हा परिषदे अंतर्गत येत्‍या 10 जूनपर्यंत पदोन्‍नत्‍या* *मुख्‍य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांची माहिती*


नांदेड दि.31: नांदेड जिल्‍हा परिषदे अतंर्गत विविध विभागातील पदोन्‍नतीच्‍या कोटयातील रिक्‍तपदे सेवाज्‍येष्‍ठतेनुसार येत्‍या 10 जून पर्यंत भरण्‍यात येणार असल्‍याची माहिती जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिली आहे. कर्मचा-यांना देण्‍यात येणा-या पदोन्‍न्‍ती संदर्भात विभागवार बैठका घेवून याद्या तयार करण्‍याच्‍या सूचना मुख्‍य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी आज झालेल्‍या बैठकित खाते प्रमुखांना दिल्‍या आहेत. 

     यापूर्वी अर्थ व पशुसंवर्धन विभागातील कर्मचा-यांना पदोन्‍नत्‍या देण्‍यात आल्‍या आहेत. दिनांक 7 मे 2021 च्‍या शासन परिपत्रकानुसार पदोन्‍नत्‍या दिल्‍या जाणार आहेत. त्‍यानुसार मुख्‍य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी सर्व विभाग प्रमुखांच्‍या बैठका घेवून नियोजन करत आहे. ब-याच दिवासापासून प्रलंबीत असलेल्‍या पदोन्‍नती  विषयाकडे मुख्‍य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी जातीने लक्ष घातल्‍यामुळे कर्मचा-यामध्‍ये आनंदाचे वातावरण तयार झाले आहे. जिल्‍हा परिषदे अंतर्गत सर्व विभागातील पदोन्‍नत्‍या होणार आहेत. विशेषत: शिक्षण, आरोग्‍य व सामान्‍य प्रशासन विभागातील पदोन्‍नत्‍या मोठया प्रमाणावर आहेत. सेवा जेष्‍ठतेनुसार या पदोन्‍नत्‍या देण्‍यात येणार आहेत. येत्‍या 10 जूनपर्यंत जिल्‍हा परिषदे अंतर्गत सर्व संवर्गातील अधिकारी व कर्मचा-यांना पदोन्‍नत्‍या देण्‍याचे काम पूर्ण करण्‍यात येणार असल्‍याची माहिती मुख्‍य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिली आहे.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News