कोरोनाची तिसरी लाट मॉन्सूननंतर मुलांवर परिणाम करणार : पालकांनो आपल्या मुलांसाठी बिनधास्तपणा सोडा -बालरोगतज्ज्ञ डॉ. सुनील भवरे - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Tuesday, June 1, 2021

कोरोनाची तिसरी लाट मॉन्सूननंतर मुलांवर परिणाम करणार : पालकांनो आपल्या मुलांसाठी बिनधास्तपणा सोडा -बालरोगतज्ज्ञ डॉ. सुनील भवरे

 





आर्णी (यवतमाळ ) : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बाधितांसह मृत्यूची संख्या चिंताजनक वाढली होती . शासनाने केलेल्या कडक निर्बंधामुळे बाधितांची संख्या कमी होत आहे . मात्र , तिसरी लाट बालकांसाठी घातक ठरणार असल्याचे सांगितले जाते . त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांसाठी बिनधास्तपणा सोडायला हवा , असे मत ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक तथा बालरोगतज्ज्ञ डॉ . सुनील भवरे यांनी '   व्यक्त केले . 

         पहिली लाट वृद्ध , दुसरी तरुण आणि तिसरी लाट बालकांसाठी घातक ठरणार असून , ती सप्टेंबर , ऑक्टोबरमध्ये धडकण्याची शक्यता वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांकडून वर्तविण्यात येत आहे . पालकांनी घाबरून न जाता सामाजिक अंतर , सॅनिटायझर , मास्क , टेस्टिंग आणि लसीकरण या पंचसूत्रीचे पालन करणे गरजेचे आहे . साधारणतः मुलांचे तीन गट आहे . ० ते ६वर्षांपर्यंत मुलांना कोरोनाचे लक्षणे सौम्य असतात . बऱ्याचवेळा संसर्ग झाल्याचे कळत नाही . सात ते १२ वर्षापर्यंतच्या मुलांना संसर्ग झाला तरी कमी तिव्रतेचा व उपचारानंतर बरे होतात . १३ ते १८ वर्षांपर्यत मुलांना  मोठ्या व्यक्तींसारखे लक्षणे आढळतात . मुलांमध्ये लक्षणे फ्लू सारखे असतात अतिसार , ताप, खोकला , डोकं दुखणे , डोळे येणे , घसा खवखव करणे आदी लक्षणे असतात . साधरणतः मूलांना गंभीर स्वरुपाचा आजार आढळून आलेला नाही . न्युमोनिया झाल्यामुळे मुलांना भरती करण्याची आवश्यकता पडू शकते . जन्मताच मुंलामध्ये प्रतिकार शक्तीमोठ्या व्यक्तीपेक्षा जास्त असल्याने ते कोणत्याही गंभीर आजाराला बळी पडत नाहीत. परंतु काही मुलांमध्ये जन्मताच गंभीर स्वरुपाचा थैलेसमिया आजार जसे दमा , हृदयाचे आजार , सिकलसेल , जन्मताच प्रतिकार शक्ती कमी असणे , एचआयव्ही बाधित , रक्तक्षय आदीमुळे प्रतिकार शक्ती कमी झाल्याने मुलांना कोरोना संसर्गाचा धोका अधिक असतो . पालकांनी सतर्क राहत मूलांच्या आहारावर लक्ष केंद्रीत करणे अंत्यत आवश्यक आहे . आहारात हिरवा भाजीपाला , कडधान्य , अंडे , मास , दूध आदींचा समावेश करावा . सार्वजनिक ठिकाणी जाणे , मित्रांना भेटणे , बाहेर खेळणे आदीमुळे कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो . त्यामुळे पालकांनी मुलांना विश्वासात घेऊन कशी काळजी घ्यावी , याची माहिती द्यावी , असे आवाहन डॉ . सुनिल भवरे यांनी केले .



 कोरोनाची तिसरी लाट मॉन्सूननंतर मुलांवर परिणाम करणार , असा निष्कर्ष वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी काढला आहे . त्यानुसार व्हेंटिलेटर्स , ऑक्सिजन , अतिदक्षता विभाग तयार करण्यात येत आहे . जिल्हास्तर , ग्रामीण रुग्णालय , उपजिल्हा रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रे आदी ठिकाणी स्वतंत्र कोरोना उपचार केंद्र सुरू करण्याचे नियोजन करण्यात येत आहे . 

-डॉ . सुनील भवरे , 

बालरोग तज्ज्ञ तथा वैद्यकीय अधीक्षक ,

ग्रामीण रुग्णालय, आर्णी .

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News