*ग्रामपंचायत विभागातील 160 अधिकारी-कर्मचार्‍यांच्या बदल्या* - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers


Wednesday, July 28, 2021

*ग्रामपंचायत विभागातील 160 अधिकारी-कर्मचार्‍यांच्या बदल्या*


नांदेड, दि.28 : नांदेड जिल्‍हा परिषदे अंतर्गत ग्राम पंचायत विभागातील विस्‍तार अधिकारी सांख्यिकी, विस्‍तार अधिकारी पंचायत, ग्राम विकास अधिकारी व ग्रामसेवक या संवर्गाच्‍या बदल्‍या समुपदेशनाने आज बुधवार दिनांक 28 जुलै रोजी पार पडल्‍या. या विभागातील 160 अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

     जिल्‍हा परिषदेच्‍या कै.यशवंतराव चव्‍हाण सभागृहात संपन्‍न होत असलेल्‍या बदली प्रक्रियेत जिल्‍हा परिषद अध्‍यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, मुख्‍य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्‍हा परिषद उपाध्‍यक्षा तथा आरोग्‍य सभापती पद्मा नरसारेड्डी सतपलवार, शिक्षण व बांधकाम सभापती संजय बेळगे, कृषी व पशुसंवर्धन सभापती बाळासाहेब रावणगावकर, समाजकल्‍याण सभापती अॅड. रामराव नाईक, अतिरिक्‍त मुख्‍य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी, मुख्‍य लेखा व वित्‍त अधिकारी रावसाहेब कोलगणे, सामान्‍य प्रशासन विभागाचे उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर ठोंबरे आदींची उपस्थिती होती.

     जिल्‍हा परिषदेच्‍या ग्राम पंचायत विभागा अंतर्गत विस्‍तार अधिकारी सांख्यिकी पदाच्‍या 7 बदल्‍या झाल्‍या असून यात प्रशासकीय 4 तर विनंतीवरुन 3 बदल्‍यांचा समावेश आहे, विस्‍तार अधिकारी पंचायत पदासाठीही 7 बदल्‍या झाल्‍या असून यात प्रशासकीय 4 तर विनंती 3 बदल्‍या झाल्‍या आहेत, ग्राम विकास अधिकारी संवर्गात एकूण 16 बदल्‍या करण्‍यात आल्‍या आहेत यात 9 प्रशासकीय तर 7 विनंती बदल्‍या आहेत. ग्रामसेवक संवर्गात एकूण 130 बदल्‍या करण्‍यात आल्‍या यात प्रशासकीय 101 तर 29 विनंती बदल्‍यांचा समावेश आहे. किनवट व माहूर या तालुक्यात रिक्त असलेल्या संपूर्ण जागा बदलीने भरण्यात आल्या आहेत.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News