जल जीवन मिशन अंतर्गत वैयक्तिक नळ जोडणी गाव कृती अराखडा तयार करण्‍यासाठी सरपंच व गावस्‍तरीय कर्मचा-यांना प्रशिक्षण - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Wednesday, July 28, 2021

जल जीवन मिशन अंतर्गत वैयक्तिक नळ जोडणी गाव कृती अराखडा तयार करण्‍यासाठी सरपंच व गावस्‍तरीय कर्मचा-यांना प्रशिक्षण





नांदेड, दि. 28 : ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबांपर्यंत नळ जोडणीव्‍दारे पाणीपुरवठा करण्यासाठी जल जीवन मिशन अंतर्गत गाव कृती आराखडा तयार करण्‍यासाठी जिल्‍हा परिषदेच्‍या पाणी व स्‍वच्‍छता मिशन कक्षाच्‍या वतीने झूम ऍपव्‍दारे दोन दिवसीय प्रशिक्षण घेण्‍यात येत आहे. आज बुधवार दिनांक 28 जुलै रोजी जिल्‍हयातील सर्व गावस्‍तरावरील सपरंच व कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्‍यात आले. उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी व्‍ही.आर. पाटील, राज्‍य पाणी व मिशनचे विभागीय समन्‍वयक अरुण रसाळ यांची यावेळी उपस्थिती होती.


      गाव कृती आराखडा, माहितीचे संकलन, मोहिम राबविण्याच्या प्रक्रिया, कोबो टूलव्‍दारे माहिती अपलोड बाबत प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी विभागीय सल्‍लागार अरुण रसाळ, मनुष्‍यबळ विकास सल्‍लागार सुशील मानवतकर, क्षमता बांधमणी तज्ञ चैतन्‍य तांदुळवाडीकर, पाणी गुणवत्‍ता सल्‍लागार कपेंद्र देसाई, सनियंत्रण व मुल्‍यमापन सल्‍लागार कृष्‍णा गोपीवार, उप कार्यकारी अभियंता रुद्रावार व उप अभियंता शास्‍त्री यांनी दोन सत्रात मार्गदर्शन केले.


         गाव पातळीवर दिनांक 1 ते 3 ऑगस्ट या कालावधीत गाव कृती आराखडयाच्या अनुषंगाने लागणारी माहिती कोबो टूल साधनाचा वापर करून संकलित करण्यात येईल. तर दिनांक 5 ते 7 ऑगस्ट दरम्यान प्राप्त माहितीवरून कृती आराखड्याची निर्मिती व गाव कृती आराखडा पडताळणी प्रक्रिया करुन दिनांक 15 ऑगस्ट 2021 रोजी होणाऱ्या ग्रामसभेमध्ये मंजुरीकरिता कार्यक्रम पत्रिकेवर ठेवण्यात येणार आहेत. यावेळी गाव कृती आराखडा अभियान यशस्वीरित्या राबविण्याचे आवाहन पाणी व स्वच्छता विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही. आर. पाटील,  ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल पाटील व राज्‍य पाणी व स्‍वच्‍छता मिशनचे विभागीय समन्‍वयक अरुण रसाळ यांनी केले.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News