वीज पडून एक शाळकरी मुलगा दगावला ; तर दुसरा जखमी घेतोय नांदेडात उपचार - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Saturday, October 9, 2021

वीज पडून एक शाळकरी मुलगा दगावला ; तर दुसरा जखमी घेतोय नांदेडात उपचार

 



किनवट : तालुक्यातील कोसमेट येथे शनिवार (दि.9) रोजी दुपारी दोनच्या सुमारास दोन विद्यार्थी आंब्याच्या झाडाखाली थांबले होते. त्यावेळी अचानक वीज पडली ; त्यामुळे एक जण जाग्यावरच गतप्राण झाला असून दुसरा मुलगा नांदेड येथे वैद्यकीय उपचार घेत आहे.

       याबाबत सविस्तर वृत्त असे की,  कोसमेट येथे राहणारे व परिषद केंद्रिय प्राथमिक शाळा, कोसमेट येथे इयत्ता पाचवीत शिकणारे सुशांत गजानन कामिलवाड (वय 11 वर्षे ) व पांडुरंग देविदास वाघमारे (वय 11 वर्षे ) हे दोघे शनिवार (दि.9) रोजी शाळेत न येता गावाजवळच दीड किमी अंतरावर एका शेतातील आंब्याच्या झाडाखाली थांबले होते. अचानक वातावरणात झालेल्या बदलाने ढगांचा गडगडाट सुरु झाला व काही कळायच्या आत या दोघांवर वीज पडली. त्यात सुशांत गजानन कामिलवाड हा घटनास्थळीच दगावल्याची भिती व्यक्तविली जाते. तर अत्यवस्थ पांडुरंग देविदास वाघमारे यास पुढील उपचारासाठी नांदेडला हलविण्यात आल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. तिथे त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

        मयत सुशांत गजानन कामिलवाड याचे पश्चात शेती करणारे वडील, घरकाम करणारी आई कोंडनबाई, एक भाऊ व एक बहिण आहे .पांडुरंग देविदास वाघमारे याचे वडील सुद्धा शेती करतात व आई रंजनाबाई ही घरकाम करते. यास दोन बहिणी आहेत.

       माहिती मिळताच इस्लापूर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. मयताचं पार्थिव उत्तरीय तपासणीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र इस्लापूर येथे दाखल केले. आकस्मिक मृत्यू गुन्हा नोंद क्रमांक 27 /21 अन्वये भादंवि 174 कलमान्वये नोंदवून इस्लापूर पोलिस अधिक तपास करीत आहेत. या घटनेने हळहळ व्यक्त केल्या जात आहे.


No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News