जागतिक टपाल दिनानिमित्त मुख्यमंत्री व शिक्षणमंत्र्यांना पत्र लिहून शाळा सुरू केल्याबद्दल मारतळा जि.प.शाळेच्या मुलांनी मानले आभार - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Saturday, October 9, 2021

जागतिक टपाल दिनानिमित्त मुख्यमंत्री व शिक्षणमंत्र्यांना पत्र लिहून शाळा सुरू केल्याबद्दल मारतळा जि.प.शाळेच्या मुलांनी मानले आभार

 



नांदेड : जागतिक टपाल दिनानिमित्त मारतळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुलांनी मुख्यमंत्री व शालेय शिक्षण मंत्री यांना पत्र लिहून शाळा सुरू केल्या बद्दल  आभार मानले आहेत.

       शनिवार (दि.9 ऑक्टोबर ) रोजी "जागतिक टपालदिन " असून सध्या या आधुनिक संगणकीय युगात पत्रांचे महत्त्व कमी झाल्याचे सर्वत्र पाहायला मिळत आहे. त्याचे महत्त्व विध्यार्थ्यांना समजावे म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून उपक्रमशील शिक्षक रवी ढगे जागतिक टपाल दिनानिमित्त मुलांना पोस्ट कार्ड आणून देतात व पत्र लेखन स्पर्धा घेतात. मागील दीड वर्षांपासून शाळा बंद होत्या. परंक दि.4 ऑक्टोबर पासून ग्रामीण भागातील 5 वी ते 8 वीचे वर्ग सुरू करण्याचे शासन आदेश आले असून नियमितपणे शाळा सुरू झाली. त्याचाच एक भाग म्हणून शाळेतील वर्ग 5 वीच्या मुलांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे , उपमुख्यमंत्री अजित पवार, शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड आदींना आभाराचे पत्र लिहिले. तसेच गावातील पोस्ट मास्तर म्हणून काम करणाऱ्या महिला कर्मचारी श्रीमती हिना शेख यांचा सत्कार करण्यात आला. 



       गेल्या दीड वर्षांपासून कोरोनामुळे शाळा बंद आहेत. शासनाच्या वतीने शाळा बंद, पण शिक्षण सुरू  या अंतर्गत मोबाईल, दीक्षा ऍप, टिली-मिली, अभ्यासमाला 2.0, शिकू आनंदे, सेतू अभ्यास आदींच्या माध्यमातून मुले शिक्षण घेत आहेत. तर काही मुलांकडे मोबाईल अथवा  टीव्ही नसल्याने त्यांच्या शिक्षणात आडथळा निर्माण होत होता. तसेच  मोबाईलवर अभ्यास केल्याने काहीमुलांचे डोळे, डोक दुखत आहेत, जास्त बैठे काम करून त्यांना आता कंटाळा आला होता, घरी सुध्दा करमत नव्हते, त्यामुळे शासनाने आता शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला असून त्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षण मंत्री या सर्वांचे एक पत्र लिहून मुलांनी पोस्ट कार्डच्या माध्यमातून अनोख्या पध्दतीने आभार मानले आहेते. ते पोस्ट कार्ड संबंधित पोस्ट मास्तरला दिले.

           यावेळी केंद्रप्रमुख टी. पी. पाटील , शाळेचे मुख्याध्यापक आनंद दरेगावे, उपक्रमशील शिक्षक रवी ढगे, विषय शिक्षक व्यंकट मुगावे, बालाजी प्यारलावार, माधुरी मलदोडे, जयश्री बारोळे, होळकर , रमेश हणमंते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News