*देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीत जितेश अंतापूरकर विजयी* - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Tuesday, November 2, 2021

*देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीत जितेश अंतापूरकर विजयी*



नांदेड, (जिमाका) दि. 2 :- देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी आज शांतता व सुव्यवस्थेत पार पडली.  मतमोजणीच्या 30 फेऱ्यानंतर निवडणूकीचा अंतिम निकाल निवडणूक निर्णय अधिकारी सचिन गिरी यांनी जाहीर केला. इंडियन नॅशनल कॉग्रेसचे जितेश रावसाहेब अंतापूरकर हे 41 हजार 933 मताच्या फरकाने विजयी झाले.



 

उमेदवार निहाय मतमोजणीत मिळालेले मते पुढीलप्रमाणे आहेत. जितेश रावसाहेब अंतापूरकर (इंडियन नॅशनल कॉग्रेस 1 लाख 8 हजार 840), सुभाष पिराजीराव साबणे (भारतीय जनता पार्टी  66 हजार 907) , उत्तम रामराव इंगोले (वंचित बहुजन आघाडी 11 हजार 348), विवेक पुंडलिकराव केरुरकर (जनता दल (सेक्युलर) 467),  प्रा. परमेश्वर शिवदास वाघमारे (बहुजन भारत पार्टी 155), डी. डी. वाघमारे (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खोब्रागडे) 215), अरुण कोंडीबाराव दापकेकर (अपक्ष 143), गजभारे साहेबराव भीवा (अपक्ष 183), भगवान गोविंदराव कंधारे (अपक्ष 274), मारोती लक्ष्मण सोनकांबळे (अपक्ष 243), श्रीमती विमल बाबूराव वाघमारे (अपक्ष 496), कॉ. प्रा. सदाशिव राजाराम भुयारे (अपक्ष 486), नोटा (वरीलपैकी कोणीही) नाही (1 हजार 103) , रद्द झालेले मतदान 30 आहे, असे एकुण 1 लाख 90 हजार 890 एवढे मतदान झाले आहे. या देगलूर पोटनिवडणूकीसाठी एकुण 150 अधिकारी कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ नियुक्त करण्यात आले होते.



No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News