चक्क मृत्यू पावलेल्या व्यक्तीला कर्तव्यदक्ष आरोग्य विभागाने तिथे जाऊन दिला कोव्हीडचा दुसरा डोस ; आरोग्य विभागाचा भोंगळा कारभार - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Wednesday, December 1, 2021

चक्क मृत्यू पावलेल्या व्यक्तीला कर्तव्यदक्ष आरोग्य विभागाने तिथे जाऊन दिला कोव्हीडचा दुसरा डोस ; आरोग्य विभागाचा भोंगळा कारभार

  




भोकर ( डॉ. कैलास कानिंदे ) : भोकर तालुक्यातील मौजे रेणापूर येथे तीन महिन्यापूर्वी मृत्यू पावलेल्या व्यक्तीला (मृत्यू नंतर जिथे जातात ) तिथे  जावून  कोव्हीडचा दुसरा डोस दिला आहे. असा संदेश पाठविला व त्यांचे प्रमाणपत्रही रिलीज केले. यातुन जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या अधिपत्याखालील आरोग्य विभागाचा भोंगळा कारभार चालू असल्याचे उघड झाले आहे .


मौजे रेणापूर ता. भोकर जि. नांदेड येथील रहिवाशी पार्वतीबाई दत्तात्रय येरेकार  ह्यांना शोधून कोव्हीडशील्ड चा दुसरा डोस दिला. कारण त्यांनी पहिला  डोस घेतला होता. दुसरा डोस घेण्यासाठी येत नसल्यामुळे आरोग्य विभाग भूतलावर शोधाशोध करून सापडत नसल्यामुळे पूर्ण यंत्रणा कामाला लावून अखेर शोध लावला आणि कोव्हीडशील्डचा दुसरा डोस देऊन जबाबदारी पार पाडली. त्याचा मॅसेज मिळाला आहे.

    दि. 29 ऑगस्ट 2021 ला मृत्यू पावलेल्या व्यक्ति पार्वतीबाई दत्तात्रय येरेकार  रा. रेणापूर ता. भोकर जि. नांदेड यांना मंगळवारी (दि.30/11/2021 )  रोजी सकाळी 8:28 AM वाजता कोव्हीडशील्ड चा दुसरा डोस घेतल्याचा मॅसेज प्राप्त झाला. म्हणून ऑनलाईन चेक केले असता, दुसरा डोस घेतल्याचे प्रमाणपत्र मिळाले. आरोग्य विभागाचा हा अनोखा प्रताप पाहायला मिळाला आहे. भूतलावर तर प्रत्येक व्यक्तीला डोस दिला आहे. त्याचबरोबर तिथे जाऊन सुद्धा डोस दिला आहे. अशा या आरोग्य विभागाचे कौतुक करावे तितकेच कमी आहे. आरोग्य विभागाच्या भोंगळ्या कारभारामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. जीवंत व्यक्तीला तर डोस दिलाच, परंतु मृत्यू पावलेल्या व्यक्तीला सुद्धा सोडले नाही.


          एकीकडे कोव्हीडच्या भितीमुळे जनता त्रस्त जीवन जगत आहे. कोणताही रोजगार मिळत नसल्यामुळे अत्यंत वेदनादायी बेकारीचे जीवन जगत आहेत." माय जेवायला देईना , बाप खाऊ देईना " या उक्तीप्रमाणे जनता त्रस्त आहे. परंतु मृत्यू पावलेल्या व्यक्तीला कोव्हीडशील्ड डोस देऊन आरोग्य विभाग जनतेची टिंगल करण्याचा कट रचल्याचे दिसते. यासाठी जबाबदार कोण? असा सवाल जनतेत निर्माण होत आहे. त्याचबरोबर अशा मृत्यू पावलेल्या किती व्यक्तीला कोव्हीडशील्ड चा दुसरा डोस दिला आहे? तिथे जाऊन डोस देणारा डॉक्टर कोण आहे? याबद्दल जनतेत जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे. ही आरोग्य विभागातील डॉक्टर मंडळी तिथूनरिटर्न आहेत का? की तेथील डॉक्टर आहेत? या विषयाला चांगलीच रंगत आली आहे . 

           

             यावरील प्रकारामुळे कोव्हीड लसीकरणा विषयी सांशकता निर्माण होत आहे. याला आरोग्य विभागाने तात्काळ आळा घातला पाहिजे . जनतेशी लंपंडाव खेळण्याच्या प्रकारावर प्रकाश टाकला पाहिजे. आरोग्य विभागाच्या लापरवाहीतून मृत्यू पावलेल्या व्यक्तींना कोव्हीडची डोस दिल्या जात आहे. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.  तिथे जावून डोस दिल्यामुळे कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याला  पुरस्कार देऊन सन्मानित करावे, असा जनतेचा सूर निघत आहे.


       कोव्हीडचा पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस घेण्यापासून कोन्हीही आलिप्त राहू नये म्हणून काळजीपूर्वक मृत्यू पावलेल्या व्यक्तीला कोव्हीडशील्ड डोस देऊन नवा उपक्रम राबविला जात आहे. म्हणजेच 100 % टक्याहून अधिक लसीकरण झालेच पाहिजे , यासाठी आरोग्य विभागाने आकाश पाताळ एक करून पूर्ण करण्यासाठी कंबर खसल्याची दिसते .



दि. 29 ऑगस्ट 2021 ला मृत्यू पावलेल्या व्यक्ति पार्वतीबाई दत्तात्रय येरेकार  रा. रेणापूर ता. भोकर जि. नांदेड यांना मंगळवार ( दि.30 नोव्हें.) रोजी कोव्हीड लसीचा दुसरा डोस घेतल्याचा मॅसेज प्राप्त झाला. म्हणून ऑनलाईन चेक केले असता, दुसरा डोस घेतल्याचे प्रमाणपत्र सुद्धा निर्गमित केले आहे. यातून असे दिसून येते की , जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी आपलं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी हा नवा फंडा तर वापरला नसावा. अशी कुजबूज ऐकावयास येत आहे .



No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News