*नांदेड जिल्ह्यात 1 कोरोना बाधित 2 कोरोना बाधित झाले बरे* - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Friday, December 3, 2021

*नांदेड जिल्ह्यात 1 कोरोना बाधित 2 कोरोना बाधित झाले बरे*


 


नांदेड (जिमाका) दि. 3 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 1 हजार 257 अहवालापैकी 1 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 492 एवढी झाली असून यातील 87 हजार 817 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 21 रुग्ण उपचार घेत असून 2 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 654 एवढी आहे.

आज जिल्ह्यातील 2 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 1, खाजगी रुग्णालय 1 असे एकूण 2 व्यक्तीला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

 

आज 21 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 3, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 15, खाजगी रुग्णालय 3 अशा एकूण 21 व्यक्ती उपचार घेत आहेत.

 

*जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.*

एकुण घेतलेले स्वॅब- 7 लाख 76 हजार 953

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 6 लाख 72 हजार 994

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 90 हजार 492

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 87 हजार 817

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 654

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.4 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-04

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-21

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-2


 

 

 

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News