नांदेड : कोवीड-19 च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात हर घर दस्तक मोहीम राबविण्यात येत असून शुक्रवार (दि. 10 ) रोजी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी किनवट तालुक्यात दौरा केला. तालुक्यातील घोगरवाडी ग्राम पंचायतअंतर्गत शिवशक्ती नगर या आदिवासी पाड्यावर त्यांनी रात्री सात वाजता भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला. सीईओ ठाकूर यांनी लसीकरणा संदर्भात गावकऱ्यांचे प्रबोधन केले. त्यानंतर नागरिक लसीकरणासाठी स्वतः होऊन पुढे आले. त्यामुळे शिवशक्ती नगर येथील 100% लसीकरणाचे उद्दीष्ट पूर्ण झाले आहे. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांचा सत्कार करण्यात आला.
दरम्यान त्यांनी जलधारा, बोधडी (बु ) व किनवट येथील गजानन महाराज संस्थान सभागृहात किनवट तालुक्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा लसीकरणा संदर्भात आढावा घेतला. यावेळी तहसीलदार डॉ. मृणाल जाधव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, शिक्षणाधिकारी(मा) प्रशांत दिग्रसकर, पंचायत समिती सभापती प्रतिनिधी दत्ता आडे , पंचायत समिती सदस्य निळकंठ कातले , गट विकास अधिकारी सुभाष धनवे, गट शिक्षणाधिकारी अनिल महामुने, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सजय मुरमुरे, बाल विकास प्रकल्प अधिकारी अश्विनी ठकरोड , पशुधन विकास अधिकारी डॉ.एस.एन. आडपोड आदींची उपस्थिती होती. उत्तम कानिंदे यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले. प्रारंभी शिक्षक विष्णू कराड यांनी लसीकरण जनजागृती गीत सादर केले. शिक्षणाधिकारी(मा) प्रशांत दिग्रसकर यांनी सर्वांना लसीकरणाची शपथ दिली. याबैठकीस तालुक्यातील सर्व विभाग प्रमुख , वैद्यकीय अधिकारी , तलाठी , ग्रामविकास अधिकारी , शिक्षण विस्तार अधिकारी , केंद्र प्रमुख , मुख्याध्यापक , ग्रामसेवक , अंगणवाडी पर्यवेक्षिका उपस्थित होते.
त्यानंतर रात्री सात वाजता मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी किनवट तालुक्यातील घोगरवाडी ग्राम पंचायतअंतर्गत शिवशक्ती नगर या आदिवासी पाड्यावर भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला. संपूर्ण कोलाम आदिम जमातीची वस्ती असलेल्या या पोडावर मुख्याध्यापक गोवर्धन मुंडे यांनी कोलामी भाषेत लोकांना लसीकरणाचे महत्व पटवून दिले होते. यावेळी शिल्लक राहिलेल्या 2 % लोकांचे प्रबोधन केल्याने तेव्हा त्यांनीही लस घेतली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी किनवट तालुक्यातील घोगरवाडी ग्राम पंचायतअंतर्गत शिवशक्ती नगर हा आदिवासी पाडा 100% लसीकरण झालेला तालुक्यातील पहिलं गाव ठरल्याचं त्यांनी घोषीत केलं.
No comments:
Post a Comment