*अंधांच्या मराठवाडा विभागीय क्रिकेट स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारोह संपन्न* ▪️अंतिम सामन्यात नांदेडचा संघ विजयी - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Sunday, June 5, 2022

*अंधांच्या मराठवाडा विभागीय क्रिकेट स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारोह संपन्न* ▪️अंतिम सामन्यात नांदेडचा संघ विजयी


नांदेड, ता. ५ जून : क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाइंड ऑफ महाराष्ट्र या संस्थेच्या वतीने श्री गुरू गोविंद सिंगजी स्टेडियम नांदेड येथे  अंधांच्या मराठवाडा विभागीय क्रिकेट स्पर्धेचा पुरस्कार वितरण समारोह दुपारी संपन्न झाला. या पुरस्कार वितरण समारोहास महापौर जयश्रीताई पावडे, दैनिक प्रजावाणीचे संपादक शंतनू डोईफोडे, आशाताई पैठणे, जिल्हा समाजकल्याण अधिकारी शेळके, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मणराव संगेवार, रमेश चौरे, मंगेश कामठेकर, सुनील यादव यांची प्रमुख उपस्थिती होती. 


या स्पर्धेत अंतिम सामना नांदेड विरुद्ध लातूर असा झाला. यात नांदेड संघाने विजय मिळविला. विजेत्या संघास रोख रक्कम सन्मान पत्र स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

        या समारोहात बोलताना महापौर जयश्रीताई पावडे यांनी क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाइंड ऑफ महाराष्ट्राच्या वतीने डिसेंबर 2022 मध्ये देशात आयोजित अंधांच्या विश्व करंडक क्रिकेट स्पर्धेतील एखादा सामना नांदेड येथे आयोजित करण्यासाठी महापालिकेच्या वतीने संपूर्ण सहकार्य केले जाईल असे सांगितले.

        स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी पंकज चौधरी, नांदेड जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू दिलीप मुंडे, क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाइंड ऑफ महाराष्ट्राचे उपाध्यक्ष  गणेश काळे माजी सचिव डॉक्टर माधव गोरे यांनी प्रयत्न केले.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News