इयत्ता 10 वी परीक्षेचा किनवट तालुक्याचा निकाल 96.48 टक्के ; 39 शाळांचा 100% व 12 शाळांचा 95% च्या वर निकाल - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Friday, June 17, 2022

इयत्ता 10 वी परीक्षेचा किनवट तालुक्याचा निकाल 96.48 टक्के ; 39 शाळांचा 100% व 12 शाळांचा 95% च्या वर निकाल

 

किनवट : इयत्ता 10 वी परिक्षेचा 100 % निकाल लागलेल्या तालुक्यातील पळशी तांडा येथील अशोक पब्लीक स्कूल (इंग्लिश मेडियम) मधील इयत्ता 10 वीतील यशवंत विद्यार्थ्यांचे संचालक एस. व्ही. रमणाराव व सहायक जिल्हाधिकारी कीर्तिकिरण एच. पुजार (भाप्रसे) यांच्या परिवासह घेतलेले छायचित्र (संग्रहीत छायाचित्र)

किनवट : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या वतीने मार्च 2022 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता 10 वी परीक्षेचा किनवट तालुक्याचा  निकाल 96.48  टक्के लागला असून 39 शाळांचा निकाल 100 टक्के तर 12 शाळांचा निकाल 95% च्या वर आहे, अशी माहिती गट शिक्षणाधिकारी अनिल महामुने यांनी दिली.

     नोंदणी केलेल्या 3411 पैकी 3267 विद्यार्थी परिक्षेस बसले होते. त्यापैकी विशेष प्राविण्यासह 1324 , प्रथम श्रेणीत 1306 , व्दितीय श्रेणीत 477 व उत्तीर्ण श्रेणीत 45 असे एकूण 3152 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

           100 % निकाल लागलेल्या शाळा : महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय घोटी, मातोश्री कमलताई ठमके विद्यालय सुभाषनगर किनवट, श्री बाबासाहेब मुखरे विद्यालय किनवट , सुमतीबाई हेमसिंग नाईक कन्या माध्यमिक विद्यालय किनवट , जिल्हा परिषद हायस्कूल शिवणी , शासकीय आश्रम शाळा पाटोदा (खु), शासकीय आश्रम शाळा जलधरा , राजा भगीरथ विद्यालय चिंचखेड , सरस विद्यालय उमरी ( बाजार) , शासकीय आश्रम शाळा सहस्त्रकुंड , हुतात्मा जयवंतराव पाटील विद्यालय कनकी , श्रीमती यशोदाबाई जोगी विद्यालय दहेली, शासकीय आश्रम शाळा जावरला, शासकीय आश्रम शाळा बोधडी (बु), सरस विद्यालय मांडवी, सरस विद्यालय (इंग्लिश मिडियम) मांडवी , शरदचंद्र पवार माध्यमिक विद्यालय निराळा तांडा , शासकीय आश्रम शाळा तलाईगुडा , संत भगवान बाबा माध्यमिक विद्यालय प्रधानसांगवी ,  बजरंग माध्यमिक विद्यालय पाटोदा (खु), रामचंद्र पाटील माध्यमिक विद्यालय परोटी तांडा, महात्मा गांधी विद्यालय अप्पारावपेठ, माणिक माध्यमिक विद्यालय चिखली (बु) स्व. संगीतादेवी हायस्कूल खंबाळा. स्व. नुरसिंग राठोड माध्यमिक विद्यालय लिंगी,  माणिक माध्यमिक विद्यालय तोटंबा, सुमन सुधाकर नाईक माध्यमिक निवासी आश्रम शाळा पळशी तांडा , संत फुलाजी बाबा आश्रम शाळा इस्लापूर , शासकीय आश्रम शाळा कुपटी (बु), शासकीय आश्रम शाळा किनवट, संत भगवान बाबा माध्यमिक विद्यालय सावरगाव तांडा, शिवबाबा अनुदानित माध्यमिक आश्रम शाळा चिखली (खु), उत्तमराव राठोड आदर्श विद्यालय गोकुंदा, संत सखाराम महाराज माध्यमिक विद्यालय राजगड तांडा, इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय गोकुंदा, श्री जेमला नाईक माध्यमिक विद्यालय भिशी, कै.प्रल्हाद गरुड माध्यमिक विद्यालय इस्लापूर , सेंट मेरी 'स इंग्लिश स्कूल गोकुंदा, अशोक पब्लिक स्कूल (इंग्लिश मिडियम) पळशी तांडा.

        95 टक्केच्या वर निकाल असलेल्या शाळा (कंसात शाळेची टक्केवारी) : माध्यमिक विद्यालय कोठारी-चि (99.11), छत्रपती शिवाजी हायस्कूल बेल्लोरी-धानोरा (98.03) , महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय गोकुंदा (97.90) , के एम पाटील माध्यमिक विद्यालय माळबोरगाव (97.72) , जिल्हा परिषद हायस्कूल मांडवी(97.43) , शिवाजी महाराज हायस्कूल कोपरा(97.14), जिल्हा परिषद हायस्कूल इस्लापूर(96.87), स.वि.मं. माध्यमिक शाळा किनवट (96.38) , अनुदानित माध्यमिक आश्रम शाळा खेरडा (96.29) , प्रियदर्शनी माध्यमिक अनुदानित आश्रम शाळा उनकेश्वर (96), जवाहेरुल उलूम उर्दू हायस्कूल किनवट(95.41), शासकीय आश्रम शाळा सारखणी (95).

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News