१९ जून रोजी NMMS परीक्षा महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय गोकुंदा या केंद्रावर होणार*शिष्यवृत्ती योजना परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश* - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers

Saturday, June 18, 2022

१९ जून रोजी NMMS परीक्षा महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय गोकुंदा या केंद्रावर होणार*शिष्यवृत्ती योजना परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश*

किनवट : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद , पुणे- १ मार्फत राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा ( NMMS ) इ . ८ वी साठी परीक्षेचे आयोजन रविवार ता. १९ जून २०२२ रोजी करण्यात आले आहे . तालुक्यातील महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय गोकुंदा या परीक्षा केंद्रावर ही परीक्षा होणार आहे. तेव्हा परिक्षेस बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांना एक तासापूर्वी परीक्षा केंद्रावर उपस्थित करावे. असे आवाहन गट शिक्षणाधिकारी अनिल महामुने यांनी केले आहे.

         ही परीक्षा महाराष्ट्रात एकूण ४९९ केंद्रावर घेण्यात येणार असून , सदर परीक्षेसाठी महाराष्ट्रातून एकूण ९२३६ शाळा व एकूण १३०९४९ विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आलेली आहे. महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय गोकुंदा या परीक्षा केंद्रावर एकूण 242 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत . परीक्षेसाठी प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे परिषदेच्या www.mscepune.in व https://nmmsmsce.in या संकेतस्थळावर शाळांना शाळा लॉगिनवर दि . ०८ जून २०२२ पासून उपलब्ध करुन देण्यात आलेली आहेत . सदर प्रवेशपत्रे विद्यार्थ्यांस उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांची असेल प्रवेशपत्राबाबत मुख्याध्यापकांना / पालकांना / विद्यार्थ्यांना काही अडचणी आल्यास त्यांनी संबंधित परीक्षा केंद्रसंचालक / शिक्षणाधिकारी ( माध्यमिक ) / महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद , पुणे -१ यांचेशी संपर्क साधावा .

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद , पुणे- १ यांचेमार्फत राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, महाराष्ट्रातील आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यामधून प्रज्ञावान विद्यार्थी शोधण्याच्या दृष्टीने या परीक्षेचे महत्व अनन्यसाधारण आहे . सन २००७-०८ पासून इयत्ता ८ वीच्या अखेर आर्थिक दुर्बल घटकातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन बुध्दिमान विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने त्यांना आर्थिक सहाय्य करावे . त्यानुसार विद्यार्थ्यांचे उच्च माध्यमिक स्तरापर्यंतचे शिक्षण घेण्यास मदत व्हावी , आर्थिक दुर्बलतेमुळे प्रज्ञावान विद्यार्थ्यांची उच्च माध्यमिक स्तरापर्यंत होणारी गळती रोखावी हे या योजनेचे उद्दिष्ट आहे . इ . ८ वी तील आर्थिक दुर्बल घटकातील ज्या पालकांचे उत्पन्न रु . १,५०,००० / - पेक्षा कमी आहे त्या विद्यार्थ्यांना परीक्षेतील गुणवत्तेच्या आधारे सदर शिष्यवृत्तीचे वाटप होईल . 

 NMMS Exam  पात्रता : 

१ ) महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही शासकीय , शासनमान्य अनुदानित , स्थानिक स्वराज्य संस्थेतील इयत्ता ८ वी मध्ये शिकत असलेल्या आणि खालील अटी पूर्ण करणाऱ्या नियमित विद्यार्थी विद्यार्थीनीस या परीक्षेस बसता येते

 २ ) पालकांचे ( आई व वडील दोघांचे मिळून ) वार्षिक उत्पन्न १,५०,००० / - पेक्षा कमी असावे . नोकरीत असलेल्या पालकांनी आपल्या आस्थापना प्रमुखांचा व इतरांनी तहसीलदारांचा / तलाठ्यांचा त्या आर्थिक वर्षांचा उत्पन्नाचा दाखला शाळेच्या मुख्याध्यापकांकडे जमा करावा . सदरचा उत्पन्नाचा दाखला मुख्याध्यापकांनी शाळेत जतन करून ठेवावा . 

३ ) विद्यार्थी / विद्यार्थ्यांनी इ .७ वी मध्ये किमान ५५ % गुण मिळवून उत्तीर्ण झालेला असावा . ( SC / ST चा विद्यार्थी किमान ५० % गुण मिळवून उत्तीर्ण झालेला असावा . ) 

 ४ ) खालील विद्यार्थी NMMS परीक्षेसाठी अपात्र आहेत . 

· विनाअनुदानित शाळेत शिकणारे विद्यार्थी , 

• केंद्रीय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी . 

• जवाहर नवोदय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी , 

• शासकीय वसतिगृहाच्या सवलतीचा , भोजनव्यवस्थेचा व शैक्षणिक सुविधांचा लाभ घेणारे विद्याथों , 

• सैनिकी शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी , 

 विद्यार्थ्यांची निवड : विद्यार्थ्यांची निवड लेखी परीक्षेमधून करण्यात येईल . संबंधित लेखी परीक्षेतील गुणांच्या आधारे व राज्याने निश्चित केलेल्या मागासवर्गीयांसाठीच्या आरक्षणानुसार विद्याथ्यांची निवड करण्यात येईल . 

       आर्थिक दुर्बलतेमुळे प्रज्ञावान विद्यार्थ्यांची उच्च माध्यमिक स्तरापर्यंत होणारी गळती रोखावी हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. केंद्रशासनामार्फत राष्ट्रीय शैक्षिणक संशोधन व प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली (एन.सी.इ.आर.टी.) यांच्या वतीने राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती  योजना परीक्षा ( NMMS) घेण्यात येते.

       या परीक्षेत यशस्वी होणाऱ्या विद्यार्थ्यांना वार्षिक बारा हजार रुपये एवढी शिष्यवृत्ती सलग चार वर्षे म्हणजे इयत्ता नववी ते बारावी पर्यंत एकूण 48 हजार रुपये मिळते बारावीपर्यंतच्या शिक्षणासाठी आर्थिक दुर्बल घटकातील मुलांना या शिष्यवृत्तीचा निश्चितच फायदा होणार आहे .

        यापूर्वी हे परीक्षा केंद्र भोकर या ठिकाणी होते त्यामुळे तालुक्यातील अनेक विद्यार्थी आर्थिक परिस्थितीमुळे या परीक्षेला जाऊ शकत नव्हते त्यामुळे गटशिक्षणाधिकारी अनिल महामुने यांनी वरिष्ठ कार्यालय संपर्क साधून किनवट तालुक्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय गोकुंदा येथे हे परीक्षा केंद्र खेचून आणले यामुळे मागील वर्षापासून या परीक्षेला बसण्याची संख्या वाढली आहे.

*शिष्यवृत्ती योजना परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश*

नांदेड (जिमाका), ता. १८ : शिष्‍यवृत्‍ती योजना परीक्षा (एनएमएमएस) सन २०२१-२२ ही रविवार १९ जून  २०२२ रोजी जिल्ह्यात १३ परिक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. या परीक्षा केंद्रापासून १०० मीटर परिसरात रविवार १९ जून रोजी सकाळी ८.३० ते सायं ५ वाजेपर्यंतच्‍या कालावधीत परीक्षार्थी व परीक्षेच्या कामाशी संबंधीत असलेले अधिकारी-कर्मचारी या व्यतिरीक्त इतर कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करता येणार नाही. या वेळेत परीक्षा केंद्राच्या परिसरातील १०० मीटर पर्यंतची सर्व सार्वजनिक टेलिफोन्स,एस.टी.डी,आय.एस.डी, भ्रमणध्वनी, फॅक्स, झेरॉक्स आणि ध्वनीक्षेपक चालू ठेवण्यास जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे  कलम १४४ अन्वये आदेशाद्वारे प्रतिबंध केले आहे.

*आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी

१९ जून रोजी शिष्यवृत्ती योजना परीक्षा*  

नांदेड (जिमाका) ता. १८ :-  महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत राष्ट्रीय आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (एनएमएमएस) सन २०२२-२२ ही घेतली जात आहे. ही परीक्षा रविवार १९ जून २०२२ रोजी दोन सत्रात परीक्षा घेण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील पुढील परीक्षा केंद्र देण्यात आले आहेत.

रविवार सकाळी १०.३० ते दुपारी ३ यावेळेत दोन सत्रात जिल्ह्यातील १३  परीक्षा केंद्रावर ही परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेसाठी नोंदणीकृत विद्यार्थी, मुख्याध्यापक, शिक्षक, पालकांनी कोणताही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच परीक्षेसंबधी काही अडचण आल्यास जिल्हा परिषदेचे उपशिक्षणाधिकारी माधव सलगर, दिलीपकुमार बनसोडे आणि विज्ञान पर्यवेक्षक बाजगीरे माधव यांच्याशी 7745851643, 9011000970, 9421293747  या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन शिक्षणाधिकारी (मा.) प्रशांत दिग्रसकर यांनी केले आहे.

आयोजित करण्यात आलेली परीक्षा केंद्र पुढीलप्रमाणे आहेत. नुतन जि.प.प्रा.शाळा भोकर, जनता हायस्‍कूल नायगाव, महात्‍मा ज्‍योतिबा फुले उमवि गोकुंदा किनवट, श्री शिवाजी हायस्‍कूल कंधार, केंब्रिज माध्‍यमिक विद्यालय शिवाजीनगर नांदेड, मानव्‍य विकास उमवि देगलूर, गुजराती हायस्‍कूल वजिराबाद नांदेड, पंचशील विद्यार्जन विद्यालय हदगाव, श्री संत गाडगेबाबा महाराज उमवि लोहा, नुतन हायस्‍कूल, उमरी, मिनाक्षी देशमुख हायस्‍कूल अर्धापुर, महात्‍मा गांधी उमवि मुदखेड, लिटल फॅ्लावर कॉव्‍हेन्‍ट स्‍कूल बिलोली ही परीक्षा केंद्र आहेत.

*आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी १९ जून रोजी शिष्यवृत्ती योजना परीक्षा*  

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News