बोधडी (बु) येथील अंध विद्यालयात 21 जून "जागतिक संगीत दिन " निमित्त शास्त्रीय सुगम गायनाचा चोवीस तासांचा अखंड स्वरयज्ञ संगीत कार्यक्रम - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Sunday, June 19, 2022

बोधडी (बु) येथील अंध विद्यालयात 21 जून "जागतिक संगीत दिन " निमित्त शास्त्रीय सुगम गायनाचा चोवीस तासांचा अखंड स्वरयज्ञ संगीत कार्यक्रम

 



किनवट : तालुक्यातील बोधडी (बुद्रूक ) येथील अंध विद्यालयात 21 जून "जागतिक संगीत दिन " निमित्त शास्त्रीय सुगम गायनाचा चोवीस तासांचा अखंड स्वरयज्ञ संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून कलाप्रेमी रसिकांनी या कार्यक्रमास बहुसंख्येने हजेरी लावावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

         ललित कलेतील सर्वश्रेष्ठ कला संगीत. आदिमानवाने निसर्गातील पशुपक्षांच्या मंजुळ नादापासून स्वरांची, वाद्यांची निर्मिती केली. अशा ह्या निसर्गरम्य आदिवासी अतिदुर्गम किनवट तालुक्यात संगीताचा प्रसार, प्रचार करावा म्हणून "जागतिक संगीत दिन" व "जागतिक योग दिन " निमित्य अंधांच्या जीवनात नवी दृष्टी देणाऱ्या आदिवासी कला शिक्षण संस्था बोधडी ( बु ) संचलित अंध विद्यालय बोधडी (बु) येथे सोमवार (दि. 20 जून ) रोजी  रात्री 12:00 नंतर म्हणजे मंगळवार (दि.21 जून ) रोजी शून्य वाजता पासून ते ( दि . 21 जून ) रात्री 12:00 वाजेपर्यंत "शास्त्रीय सुगम गायनाचा चोवीस तासांचा अखंड स्वरयज्ञ संगीत कार्यक्रमाचे " आयोजन सूरमणी स्मृतिशेष पंडित वसंतराव शिरभाते गुरुजी यांच्या सर्व शिष्य परिवारांच्या वतीने करण्यात आले आहे.

        सर्व संगीत रसिकांनी या अनोख्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन अंध विद्यालय संयोजन समितीच्या वतीने करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News