*आजादी का अमृत महोत्सव निमित महाजीविका अभियानांतर्गत नांदेड रेल्वे स्टेशनवर समूहांना विक्री साठी जागा ऊपलब्ध.* - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Tuesday, June 21, 2022

*आजादी का अमृत महोत्सव निमित महाजीविका अभियानांतर्गत नांदेड रेल्वे स्टेशनवर समूहांना विक्री साठी जागा ऊपलब्ध.*

 



नांदेड : भारतीय रेल्वे नांदेड विभाग व जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष नांदेड महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार ( ता. 20 ) रोजी जिल्हातील स्वयं सहायता समूहाना नांदेड जिल्ह्यातील 16 रेल्वे स्थानकावर स्वयंसहायता समूहाचे  उत्पादित मालाचे स्टॉल लावण्याच्या संदर्भाने जिल्हा अभियान कक्षात बैठक पार पडली. 

      या प्रसंगी नांदेड विभागाचे प्रमुख वाणिज्य निरीक्षक संजीव कुमार शर्मा व सिकंदराबाद विभागाचे प्रमुख  मनोज कुमार यांनी नांदेड जिल्ह्यातील सर्व रेल्वे स्टेशनवर महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातील (उमेद) महिला स्वयंसहाय्यता समूहांना रेल्वस्थानक प्लॅटफॉर्मवर गटांनी बनवलेल्या अन्नपदार्थ आणि विविध वस्तू यांची विक्री करण्यासाठी  उपलब्ध करून देऊ असा महत्वाकाक्षी निर्णय  बैठकीत घेण्यात आला. अत्यंत कमी दरात स्टेशनवर जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला असून.आता रेल्वे प्रवाशांना, महिला स्वयंसहाय्यता समूहांनी बनवलेल्या रुचकर पदार्थ आणि विविध वस्तू यांची गावरान मेजवानी खाण्यासाठी व वस्तूची खरेदी करण्याची संधी मिळाली आहे. गटातील महिलांनी या संधीचा लाभ घ्यावा. 

       तसेच आपली आर्थिक प्रगती करावी. तालुक्यातील अधिकारी व कर्मचारी यांना असे मार्गदर्शन करून प्रत्येक स्थानकावर रेल्वे बोर्डाकडून मार्केटिंग आउटलेट उपलब्ध करून लावण्यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर घुगे  व  प्रकल्प संचालक डॉ. संजय तूबाकले यांच्या मार्गदर्शनाखाली आज नियोजन करण्यात आले. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील गरीब व वंचित घटकातील स्वयं सहायता  समूहातील महिलांना व्यवसायासाठी खूप मोठे प्लॅटफॉर्म उपलब्ध होणार आहे. रेल्वेस्थानकावर  महिला सशक्तिकरण अभियानचे उद्दिष्ट निश्चितच पूर्ण होईल. आजच्या या महत्त्वपूर्ण बैठकीसाठी जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्षाचे DMM  गजानन पातेवार,  द्वारकादास राठोड जिल्हा व्यवस्थापक - क्षमता बांधणी, जिल्हा व्यवस्थापक - मार्केटिंग  धनंजय भिसे  व जिल्हा व्यवस्थापक - FI माधव भिसे कौशल्य  समन्वयक अतिष गायकवाड तसेच तालुका अभियान कक्षातील सर्व अधिकारी कर्मचारी याप्रसंगी उपस्थित होते.  जिल्हा अभियान कक्षाच्या वतीने जिल्हा व्यवस्थापक MIS गणेश कवडेवार यांनी रेल्वे बोर्डाच्या अधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केले आहे.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News