नांदेड : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत सोमवार (ता. 20 ) रोजी जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष नांदेड यांच्या सहकार्याने नवीन उद्योजक / अन्न व्यावसायिक व कर्मचारी यांना अन्न सुरक्षा मानदे कायदा 2006 अंतर्गत अन्न परवाना / नोंदणी विषयी मार्गदर्शन करण्यात आले .
सदर मार्गदर्शन सहायक आयुक्त बी .बी भोसले व जि.ग्रा.वी. यां.नांदेडचे प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबकले यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी अनिकेत भिसे यांनी पार पाडले . मार्गदर्शन शिबिराकरिता जिल्हा अभियान व्यवस्थापक गजानन पतेवार , जिल्हा व्यवस्थापक- विपणन धनंजय भिसे , जिल्हा व्यवस्थापक -संस्था बांधणी द्वारकादास राठोड , गणेश कवडेवार, कौशल्य समन्वयक अतिश गायकवाड व जिल्हा व्यवस्थापकFI माधव भिसे सर्व तालुक्यातील अभियान व्यवस्थापक व कर्मचारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment