महाराष्ट्र मध्ये राजकीय भूकंप ! - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Tuesday, June 21, 2022

महाराष्ट्र मध्ये राजकीय भूकंप !

 



मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीनंतर राज्यांमध्ये राजकीय हालचालींना वेग आला. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी दोन्ही निवडणूकित आपले संख्याबळ नसतानाही आपले उमेदवार निवडून आणल्यामुळे राज्यातील भारतीय जनता पक्षाचे वजन व पर्यायाने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे राजकीय वजन वाढले होते. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे  35 आमदारांसह मुंबई सोडून गुजरातमध्ये गेल्याची चर्चा रंगली असतानाच काही काँग्रेसचे आमदार सुद्धा आपल्या पक्षातील नेत्यांवर नाराज असल्याचे सूत्रांनी सांगितले यामुळे काँग्रेस नेत्यांनी आपल्या सर्व आमदारांना मुंबईत दुपारी चार वाजेपर्यंत एकत्र येण्याची सूचना दिली आहे. तर दुसरीकडे शिवसेनेचे मंत्री आणि बागी नेते एकनाथ शिंदे यांनी काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षासोबत असलेली युती तोडून भाजपबरोबर सरकार स्थापण्याची चर्चा करण्याचे आव्हान पक्षनेतृत्वाला दिलेले आहे. आता मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांच्या समोर पक्ष वाढवायचा की सरकार वाचवायचे हा मोठा यक्ष प्रश्न आहे? 

          शिवसेनेच्या सरकार स्थापनेपासूनच एकनाथ शिंदे हेच चर्चित नेते राहिलेत. प्रचंड आत्मविश्वास, दांडगा जनसंपर्क असलेले ठाण्यातील नेते एकनाथ शिंदे यांची पक्षात अवहेलना होते असे त्यांचे मत होते. सुभाष देसाई सारखे निष्क्रिय नेते हे राजकारणामध्ये जास्त प्रभावी ठरले जे स्वतः निवडून येत नाहीत ते मंत्रीपद भूषवतात. अनिल देसाई , अनिल परब यांचे सेनेतील वाढते वर्चस्व एकनाथ शिंदे यांना नेहमीच खुपत असे. यामुळेच एकनाथ शिंदे यांची नाराजी वाढत होती. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे  यांचे मुख्यमंत्री स्पर्धेत कधीच नाव नव्हते. परंतु राजकीय अस्थिरता निर्माण होऊ नये म्हणून खुद्द शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपद देण्याची सूचना केली आणि अडीच वर्ष उद्धव ठाकरे यांनी  मुख्यमंत्री पद सांभाळले. या पदावर खरा दावा जर कोणाचा होता तो म्हणजे एकनाथ शिंदे यांचा.        

         महाविकास आघाडीची दोन वर्षे ही कोरोनाच्या काळामध्ये गेली. यामुळे महाविकास आघाडीला पाहिजे तसा आपला ठसा उमटवता आला नाही. राज्यसभेच्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांना नामुष्की पत्करावी लागली. कारण काँग्रेसच्या आमदारांनी त्यांना साथ दिली नव्हती. याचाच वचपा शिवसेनेने आता काढला काय? अशी चर्चा सुरू झाली आहे. विधान परिषदेच्या निवडणूक शिवसेना आमदाराने काँग्रेसला विधानपरिषद निवडणुकीत सहकार्य करण्यास नकार दिला काँग्रेसचे उमेदवार चंद्रकांत हांडोरे यांचा पराभव झाला. शिवसेनेचे दोन सदस्य विधान परिषदेवर निवडून आले. परंतु आज जल्लोष साजरा करता आला नाही. कारण दुसऱ्या दिवशी सकाळी बातमी येते ती म्हणजे एकनाथ शिंदे आपल्या पस्तीस आमदारांना घेऊन गुजरात येथे हॉटेलमध्ये उतरले. महाराष्ट्रातील हा मोठा राजकीय भूकंप होता. भारतीय जनता पक्षाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांनी लोटस ऑपरेशन सक्सेस केला. याची चर्चा आज राज्यभर होत आहे. शिवसेनेचे आमदार नॉटरिचेबल होत असतानाच राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, अजित दादा पवार हे मात्र मौन बाळगून आहेत. राजकारणात शाश्वत असे काहीच नसतं. राजकारणात कोणावरच विश्वास  ठेवायचा नसतो. राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा मित्र नसतो व कायमचा शत्रू नसतो हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. आज महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडणारे काँग्रेस व राष्ट्रवादीचे नेते नव्हते , होते शिवसेनेचे 35 आमदार . महाराष्ट्र राज्य राज्यपाल यांच्या भूमिकेकडे आत्या सार्‍या देशाचे लक्ष लागले आहे.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News