महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू एकनाथ शिंदें सोबत - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Wednesday, June 22, 2022

महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू एकनाथ शिंदें सोबत

 


मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : महाराष्ट्राच्या राजकारणातील तळागाळातील, सर्व सामान्य जनतेशी सामान्य व्यक्ती प्रमाणे वागणारे असामान्य व्यक्तीमत्व म्हणजे शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू. महाराष्ट्रात सत्ता बदलण्याचे वारे वाहू लागले. शिवसेनेचे वजनदार मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाला. शिवसेनेचे अनेक आमदार एकाच रात्री महाराष्ट्रातून गुजरातला पोहचले व दुसऱ्या रात्री "आस्मान" मधून आसाम मध्ये पोहचले.शिवसेनेच्या आमदारांबरोबरच एक नाव प्रसार माध्यमात झळकले ते म्हणजे महाराष्ट्र राज्याचे शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू.

        ओमप्रकाश बाबाराव कडू उर्फ बच्चू कडू हे महाराष्ट्रातील राजकारणातील सूपरिचित नाव. ते प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आहेत. बच्चू कडू हे अचलपूर विधानसभा मतदारसंघातून सलग चौथ्यांदा निवडून आलेले अपक्ष आमदार आहेत. युवकांचे संघटन करून शेतकरी, दिव्यांग आणि स्थानिकांचे अनेक प्रश्न त्यांनी आक्रमकपणे समोर आणले आहेत. 

         जन्मतारीख: ५ जुलै, १९७० (वय ५१ वर्ष) वर्षीय बच्चू कडू यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार तालुक्यातील बेलोरा येथे झाला. त्यांचं शिक्षण बीकॉमपर्यंत झालं आहे. त्यांची पत्नी शिक्षिका आहे. त्यांना एक मुलगा असून शेती हाच त्यांचा मुख्य व्यवसाय आहे.शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांने प्रभावित झालेले काही काळ शिवसेने मध्ये असलेल्या व महाविकास आघाडीच्या सरकार मध्ये मंत्री असलेल्या नेत्यानी एकनाथ शिंदे यांच्या साथीला गेल्यामुळे सरकारला फार मोठा हादरा बसला आहे. राज्यातील सरकार हू तीन पक्षाचे असले तरी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस कडून सरकार कोसळले नसेल तर ते शिवसेनेच्या नेत्यांनी पाडले ही खंत मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांच्या फेसबुक लाईव्ह संभाषणात दिसून आली. 

       बच्चू कडू यांचा इतर आमदारांशी असलेले नाते व दांडगा जनसंपर्क, पत्रकारांशी असलेले जवळचे संबंध यामुळे सरकार कोणतेही असो बच्चू कडू हे नाव चर्चित राहणार. एकनाथ शिंदे यांचा बंडाळीत इतरांना अपेक्षित नसलेले अपक्ष आमदार बच्चू कडू यांच्या प्रहाराने सेना मात्र घायाळ झाली आहे.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News