कोकण आणि मध्य महाराष्ट्रात 25 जूनपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Wednesday, June 22, 2022

कोकण आणि मध्य महाराष्ट्रात 25 जूनपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता

 



 मुंबई : कोकणातील मुंबईसह रायगड, पालघर, ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात तर दक्षिण मध्य महाराष्ट्रात सातारा आणि कोल्हापूरातील घाट भागातील काही ठिकाणी दि 22 ते 25 जून दरम्यान पुढील चार दिवस मुसळधार ते अतिमुसळधार  पाऊस  पडण्याची शक्यता प्रादेशिक हवामान केंद्र,कुलाबा, मुंबई यांनी वर्तविली आहे.


            दि. 22 जून रोजी मराठवाड्यात वादळ वारा व विजेच्या गडगडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस तर पुण्यातील घाट भागातील काही ठिकाणी दि. 23 ते 25 जून दरम्यान मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.


            मच्छीमारांनीही पुढील चार दिवस महाराष्ट्र- गोवा सागरी किनाऱ्यावर जावू नये, अशा सूचना प्रादेशिक हवामान विभागाने दिल्या आहेत. मालवण ते वसई सागरी किनाऱ्यावर दि. 22 जूनच्या मध्यारात्रीपर्यंत 3-3.1 मीटर उंच लाटा उसळण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News