कार्यकारी अभियंतापदी पदोन्नती झाल्याबद्दल व 55 व्या वाढदिवसा निमित्त अभियंता अशोक येरेकार यांचा सत्कार - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Wednesday, June 22, 2022

कार्यकारी अभियंतापदी पदोन्नती झाल्याबद्दल व 55 व्या वाढदिवसा निमित्त अभियंता अशोक येरेकार यांचा सत्कार

 



औरंगाबाद : येथील अग्रणी सामाजिक कार्यकर्ते अभियंता अशोक येरेकार यांची कार्यकारी अभियंतापदी पदोन्नती झाल्याबद्दल त्यांच्या 55 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.

         रेल्वे स्टेशन रोड वरील ग्रेट पंजाब हॉटेल येथे मंगळवार (ता. 21 ) रोजी  सायंकाळी 7 वाजता  बानाईचे कार्यकर्ते निवृत्त सहायक अभियंता भरतकुमार कानिंदे व अभियंता बाबुराव मस्के यांनी हा सत्कार कार्यक्रम आयोजित केला होता.

       सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारे बौद्ध धम्माच्या तत्वांचे आचरण व अनुसरण  करणारे सार्वजनिक बांधकाम विभाग औरंगाबादचे अभियंता अशोक येरेकर यांची औरंगाबाद येथेच कार्यकारी अभियंतापदी पदोन्नती झाल्याबद्दल त्यांचा सपत्नीक सत्कार व  55 व्या वाढ दिवसा निमित्त त्यांचे अभिष्टचिंतन करण्यात आले. या समारंभास औरंगाबाद शहर आणि परिसरातील सर्व सन्माननीय नातेवाईक मंडळी आणि त्यांचा मित्रपरिवार बहुसंख्येनं उपस्थित होता. 

       राजीव सरपे यांनी सामूहिक 'बुद्ध वंदना' घेऊन कार्यक्रमाची सुरुवात केली. याच कार्यक्रमात  "औरंगाबाद नातेवाईक मंच ,"  "मानव उत्कर्ष महिला बचत गट ," "जिव्हाळा महिला बचत गट ," "सम्यक दिशा महिला बचत गट " व  "संकल्प महिला बचत गट" यांच्या वतीने उपासक जी. एस. पाटील यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन अभियंता अशोक येरेकार व आशा येरेकार यांचा सत्कार सत्कार केला.  

      तसेच सत्यशोधक फाऊंडेशन व सेवाभावी संस्था नांदेडच्या वतीने महाकवी वामनदादा कर्डक जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित साहित्य संमेलनात नुकताच  " वामनदादा कर्डक जन्मशताब्दी समाज भूषण पुरस्कार" गौरविण्यात आल्याबद्दल अभियंता भरतकुमार कानिंदे यांचा विश्वनाथ कावळे यांनी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. 

     याप्रसंगी उपासक जी. एस. पाटील व महिला प्रतिनिधी त्रिवेणी बापुरावजी कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रा. डॉ. सुनिल कावळे यांनी बहारदार सूत्रसंचालन केले. अभियंता भरतकुमार कानिंदे यांनी अतिशय साध्या सरळ शब्दांमध्ये आपली सामाजिक तळमळ आणि आपला संघर्ष याप्रसंगी विषद केला. सत्कारमूर्ती अभियंता अशोक येरेकर यांनी ओघवत्या शैलीमध्ये आपला शालेय जीवन ते कार्यकारी अभियंता होण्यापर्यंतचा संघर्ष, बुद्ध धम्माची कास धरून कसा पूर्ण केला हे मांडले. त्यांना तितक्याच ताकदीने मोलाची साथ देणाऱ्या त्यांच्या सुविद्य पत्नी उपासिका आशाताई अशोक येरेकार यांनीही त्यांचे  मनोगत मांडले. यानंतर जन्म दिवसाचा केक कापून उभयतांनी आनंद द्विगुणित केला. प्रसंगी सर्व नातेवाईक मित्र परिवारांनी शुभेच्छा आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिष्टचिंतन केले. 

       याप्रसंगी पत्रकार सुरेश पाटील, पत्रकार जितेंद्र भवरे, महावितरणचे अधिक्षक अभियंता संजय कांबळे, बांधकाम व्यावसायिक अभियंता प्रकाश नगारे, डॉ. बालाजी गिमेकर , प्रभाकर भगत , महेंद्र पोपलवाड, बापुराव कांबळे,  प्रमोद कांबळे, राजीव सरपे आदिंसह  समस्त नातेवाईक आणि मित्र परिवार हजर होते. सर्वांनी शेवटी सुरुची भोजनाचा आस्वाद घेतला आणि कार्यक्रम संपन्न झाला. 

      कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी भगवान गायकवाड यांनी परिश्रम घेतले. 

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News