... शिक्षणात नवक्रांती करणारे तीन गुन्हेगार..... - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers


Monday, July 18, 2022

... शिक्षणात नवक्रांती करणारे तीन गुन्हेगार.....
पुणे : आज पुण्यात रणजित डिसले, दत्तात्रय वारे व युवराज घोगरे हे महाराष्ट्रातील तीन प्रसिद्ध प्रयोगशील शिक्षक आले होते.त्यापैकी दत्ता वारे व युवराज घोगरे यांची आज विभागीय चौकशी होती तर रणजित डिसले यांना त्यांचे प्रकरण समजून घ्यायला शिक्षण आयुक्त यांनी बोलावले होते....

     युवराज घोगरे(डावीकडून पहिले) यांनी लोकसहभागातून शाळेची वेस बांधली व त्यावर देणगीदाराचे नाव टाकले त्यावरून गावात त्रास सुरू झाला व त्रास इतके विकोपाला गेले की युवराज ची अँजिओप्लास्टी करावी लागली व चौकशी सुरू झाली..मोबाईल ला काय स्टेटस ठेवले हे ही आरोप आहेत.ही केवळ झलक आहे.सततच्या या चौकशामुळे दत्ता वारे,युवराज घोगरे हे निराश झाले आहेत


दत्ता वारे यांचे निलंबन मागे घेतले तरी चौकशी सुरूच आहे. रणजित दिसले हे शनिवारी मुंबईत, आज शिक्षण आयुक्त उद्या सोलापूर CEO असे फिरत आहेत....


आणि तिघेही महाराष्ट्रातील शिक्षकांचे प्रेरणास्थान राहिलेले आहे. पुन्हा नेहमीचा मुद्दा मांडला जाईल की चूक केली तर चांगले काम असेल तर सोडून द्यायचे का ? प्रश्न तो नाहीच

सुरुवात द्वेषातून होते.त्यातून दोष शोधले जातात व ते नंतर इतके मोठे करून सांगितले जाते ...  की बोला हे मान्य आहे की नाही ? याभोवतीच चर्चा केंद्रित करून त्यांचे मूळ काम चर्चेतून बाजूला पडते...

 *प्रयोगशील व वेगळ्या माणसांच्याच वाट्याला हे का येते ? हा प्रश्न अनुत्तरित आहे* 


ताजा कलम : दत्ता वारे यांच्या पायात चप्पल नाही.निर्दोष जाहीर होईपर्यंत मी चप्पल घालणार नाही अशी त्यांची प्रतिज्ञा आहे..आता त्याला १ वर्ष होत आले.इतके हे संवेदनशील शिक्षक आज गुन्हेगार ठरताहेत.


हेरंब कुलकर्णी यांच्या facebook वॉल वरून साभार


No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News