अतिवृष्टीची हेक्टरी ५० हजार नुकसान भरपाई द्या -किसान सभा #३१ जुलै रोजी तालुक्याभरात आंदोलन - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Tuesday, July 19, 2022

अतिवृष्टीची हेक्टरी ५० हजार नुकसान भरपाई द्या -किसान सभा #३१ जुलै रोजी तालुक्याभरात आंदोलन

 



इस्लापूर(किनवट ) : येथील हुतात्मा स्मारक भवनात अखिल भारतीय किसान सभेचा शेतकरी मेळावा  किसान सभेचे जिल्हा सचिव काॅ. शंकर सिडाम यांच्या अध्यक्षतेखाली व काॅ.अर्जुन आडे यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाला. 

        गेल्या आठवड्याभरात पाऊसाने हाहाकार माजवला असुन प्रचंड अतिवृष्टीने शेतीपिके संपूर्णपणे उदध्वस्त झाली आहेत. नदी नाल्या लगतची शेती खरडून निघाली आहे. असमानी आणि सुलतांनी सकटात शेतकरी सापडला असतांना अजून सुध्दा प्रशासनाकडुन पंचनामे पूर्ण झालेले नाहीत. इस्लापूर, जलधरा, शिवणी, अप्पारापेठ मंडळात रेकार्ड पाऊसाची नोंद झालेली आहे.  

       संपूर्ण शेती पिकांचे अतिवृष्टिने  जबरदस्त नुकसान झालेले असताना सरकारकडून तातडीने मदत जाहीर करण्याची आवश्कता असतानां सत्तेसाठी काय झाडी, काय डोंगर , काय हाॅटेल च राजकारण सरकार करत असुन शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत आहे. शेतीपिंकाच्या नुकसान भरपाईसाठी तातडिणे ५० हजार हेक्टरी मदत जाहीर करा या प्रमुख मागीसह,अतिवृष्टीने अनेक घरांची झालेली पडझड, पशु जनावरे दगावली त्याची नुकसान भरपाई,  वन जमीन कसत असलेल्या शेतकऱ्यांना वन अधिकार कायद्याची ठोस अंमलबजावणी करुन वन कास्तकांराना हकलून लावणे थांबवा. गावा गावात वंचित राहिलेल्या गरजुनां पंतप्रधान आवास योजनेत समाविष्ट करा तथा घरकुलाची अनुदान रक्कम ५ लाख पर्यंत करा. गावा गावाला जोडणारी बांधकाम विभाग, जिल्हा परिषद अंतर्गत येणारी सर्व रस्ते,पुले तातडीने बांधा, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करुन हमीभावाचा केद्रिंय कायदा करा या मागण्यासाठी तालुक्याभरात इस्लापूर, बोधडी, मांडवी , किनवट इत्यादी ठिकाणी ३१ जुलै रोजी जोरदार आंदोलन करण्याचा निर्धार मेळाव्यात करण्यात आला.

        जर तातडीने अतिवृष्टीची नुकसान भरपाई न मिळाल्यास प्रसंगी हजारो शेतकऱ्यांना घेऊन जेल भरो आंदोलन करण्याचा इशारा यावेळी किसान सभेचे नेते काॅ.अर्जुन आडे यांनी दिला. मेळाव्यात शंकर सिडाम, तुकाराम व्यवहारे, तानाजी राठोड, अनिल आडे , शेषराव ढोले, खंडेराव कानडे, नारायण वानोळे, कोंडबाराव खोकले, अडेलु बोनगीर, मारोती फोले मंचावर उपस्थित होते.

         मेळावा यशस्वी करण्यासाठी आनंद लव्हाळे , राम कंडले, किशन देशमुख, दिलिप तुमलवाड, शिवाजी किरवले, अंबर चव्हाण, यंशवंत राठोड, स्टॅलिन आडे ,गंगाराम गाडेकर, साईनाथ राठोड, अजय आडे, अरुण चव्हाण आदि कार्यकर्त्यांनी परिश्रम  घेतले. यावेली परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News