शासकीय वसतिगृहातील प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers


Wednesday, July 20, 2022

शासकीय वसतिगृहातील प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 


 

नांदेड (जिमाका) : सामाजिक न्याय विभागाअंतर्गत असलेल्या मागासवर्गीय मुला-मुलींच्या सर्व शासकीय वसतिगृहात या शौक्षणिक वर्षासाठी विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश देण्याबाबतची प्रक्रिया सुरु झालेली आहे. जिल्ह्यातील इच्छुक व पात्र विद्यार्थ्यांनी वसतिगृह प्रवेशासाठी मुदतीत अर्ज करावेत, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त डॉ. तेजस माळवदकर यांनी केले आहे. 

 

इयत्ता आठवीत शिक्षण घेत असलेल्या तसेच इयत्ता अकरावीमध्ये शिक्षण घेणाऱ्या व पदवी  प्रथम वर्षात व पदव्युत्तर प्रथम वर्षात शिक्षण घेत असलेल्या प्रवेशोत्सूक विद्यार्थ्यांनी संबंधित वसतिगृहातील गृहपाल यांच्याकडे प्रवेश अर्ज भरून द्यावेत. इयत्ता 8 वीच्या शालेय विद्यार्थ्यांसाठी शुक्रवार 15 जुलै तर इयत्ता 10 वी व 11 वी साठी शनिवार 30 जुलै पर्यंत प्रवेश अर्ज भरुन सादर करावेत. तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी 30 सप्टेंबर 2022 पर्यंत प्रवेश अर्ज भरुन सादर करावे. त्यानंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाहीयाची संबंधितांनी नोंद घ्यावी, असेही समाज कल्याण विभागाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे. 

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News