कुमारस्वामी महाविद्यालयाने राष्ट्रीय 1 व जागतिक 2 विक्रम करून इंडिया, एशिया व इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदवले नाव - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Wednesday, July 20, 2022

कुमारस्वामी महाविद्यालयाने राष्ट्रीय 1 व जागतिक 2 विक्रम करून इंडिया, एशिया व इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदवले नाव

 



औसा (लातूर ) : येथील श्री कुमारस्वामी महाविद्यालयाने, जास्तीत जास्त ऑनलाइन वेबिनार मालिका यशस्वीपणे आयोजित करण्याचा विक्रम केल्याने देश पातळीवरील एक व जागतीक स्तरावरील दोन रेकॉर्डस आपल्या नावावर केल्याने सर्वत्र त्यांचा गौरव होत आहे.

    श्री कुमारस्वामी महाविद्यालय, औसा (जि. लातूर), या महाविद्यालयाच्या सुर्वण महोत्सवी वर्षानिमित्त प्राचार्य डॉ. एम. एम. बेटकर यांनी महाविद्यालयाच्या वतीने तारीख 27 जून 2020 ते 7 जुलै 2022 दरम्यान महिला सक्षमीकरणासाठी राष्ट्रीय स्तरावरील 455 वेबिनारची ऑनलाईन मालिका यशस्वीपणे आयोजित केली होती. हा देशातील एकमेव उपक्रम होता. याची दखल एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स (एबीआर), इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स (आयबीआर) व इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्स (आयबीआर) या तीन संस्थांनी घेतली व त्यांच्या नावे तीन विक्रम स्थापित करून गौरव केला. 

        याबद्दल श्री महंतस्वामी शिक्षण प्रसारक मंडळ,औसाचे अध्यक्ष गहिनीनाथजी महाराज , सचिव गिरीश पाटील , संस्थेचे सर्व पदाधिकारी व हितचिंतकांनी प्राचार्य डॉ. एम. एम. बेटकर (9421769537) व सहकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

        राष्ट्रीय पातळीवर एक व आंतरराष्ट्रीय पातळीवर दोन रेकॉर्ड शिर्षक महाविद्यालयास मिळाल्या बद्दल सर्व तज्ज्ञ मार्गदर्शक, सर्व सहभागी, आयोजन समितीचे सदस्य आणि प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षपणे सहकार्य करणाऱ्या सर्वांचे प्राचार्य डॉ. एम. एम. बेटकर यांनी आभार मानले आहेत.



        प्राचार्य डाॅ. महेश्वर मल्लिकार्जून बेटकर हे संशोधन वृत्तीचे असून सातत्याने विविध प्रयोग करणे त्यांना आवडते. आकाश निरिक्षण हा त्यांचा छंद आहे. या छंदापायी त्यांनी स्वतः महागडी दुर्बिण विकत घेतली असून याद्वारे ते आकाश निरिक्षण करतात. तसेच विद्यार्थ्यांना आकाश दर्शन घडवितात. ग्रह - ताऱ्यांची माहिती त्यांना देतात. 

        नवोपक्रमशीलतेच्या आकांक्षेपायीच त्यांनी आपल्या महाविद्यालयाच्या वतीने थोर राष्ट्रपुरुष , शास्त्रज्ञ यांच्या जयंत्या मयंत्या तसेच दिन विशेषानिमत्ती विविध विषयावर ऑनलाईन वेबिनार घेतले आहेत. यानुषंगानेच महिला सक्षमीकरणासाठी राष्ट्रीय स्तरावरील 455 वेबिनारची ऑनलाईन मालिका यशस्वीपणे त्यांनी आयोजित केली होती. या उपक्रमाने त्यांच्या महाविद्यालयाच्या नावे राष्ट्रीय स्तरावरील एक व आंतरराष्ट्रीय स्तरावरील दोन असे तीन रेकॉर्ड झाले आहेत.





    

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News