अतिवृष्टीमुळे ध्वस्त शेतीचे तात्काळ पंचनामे करून हेक्टरी ₹ 50 हजार द्यावे ; मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेडने दिले मागण्यांचे निवेदन - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Friday, July 22, 2022

अतिवृष्टीमुळे ध्वस्त शेतीचे तात्काळ पंचनामे करून हेक्टरी ₹ 50 हजार द्यावे ; मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेडने दिले मागण्यांचे निवेदन



किनवट :- तालुक्यातील अतिवृष्टीमुळे पिकाचे नुकसान झालेल्या शेतीचे तात्काळ पंचनामे करून हेक्टरी 50 हजार रुपये आर्थिक मदत द्यावी , असे निवेदन  मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड यांच्यावतीने तहसीलदार यांना देण्यात आले. 

        मागील आठवड्यात  तालुक्यामध्ये संततधार पावसामुळे गेल्या पंधरा दिवसापासून सूर्यदर्शन झाले नव्हते. सततच्या पावसामुळे शेतीची अवघड परिस्थिती निर्माण झाली होती. एक पेरणी नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुपार पेरणीचे संकट आले आहे. कोसळलेल्या नैसर्गिक संकटामुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. तेव्हा अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या ध्वस्त झालेल्या पिकांच्या शेतीचे प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून हेक्टरी 50 हजार रुपयाची तात्काळ मदत द्यावी, अशा मागणीची निवेदन मराठा सेवा संघ व  संभाजी ब्रिगेड तर्फे देण्यात आले.

        या निवेदनावर संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष अजय कदम पाटील , शहराध्यक्ष रणजीत चव्हाण , शहर कोषाध्यक्ष अतुल खरे , तालुका उपाध्यक्ष सुरेश जाधव व सचिव सूरज चव्हाण यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News