विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर शैक्षणिक बुद्धीमत्ता वाढविण्यासाठी करावा -दिवाणी न्यायाधीश शंकर अंभोरे - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Saturday, July 23, 2022

विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर शैक्षणिक बुद्धीमत्ता वाढविण्यासाठी करावा -दिवाणी न्यायाधीश शंकर अंभोरे

 



किनवट : सध्याच्या विज्ञान युगात स्पर्धेत टिकून राहण्यासाठी विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर शैक्षणिक बुद्धीमत्ता वाढविण्यासाठी करावा, असे प्रतिपादन तालुका विधी प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश शंकर अंभोरे यांनी केले.

      मा. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार 'सामान्य किमान कार्यक्रम' अंतर्गत तालुका विधी सेवा समितीच्या वतीने गोकुंदा येथील महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय व राजकुंवर महिला महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (ता. 23) गोकुंदा येथे आयोजित 'कायदेविषयक शिबीराचा' अध्यक्षीय समारोप ते बोलत होते.

      यावेळी पंचायत समितीचे कृषी अधिकारी शिवराम मुंडे, फौजदार गणेश पवार, मिलिंद शिक्षण प्रसारक मंडळ सचिव अभियंता प्रशात ठमके, सचिव ऍड. पी. पी. गावंडे , कोषाध्यक्ष ऍड. सुनिल येरेकर , ऍड. टी.आर. चव्हाण, ऍड. राठोड आदि मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

      याप्रसंगी वकील संघाचे अध्यक्ष ऍड. अरविंद चव्हाण यांनी 'बेटी बचाओ - बेटी पढ़ाओ' , 'ऍड. विलास शामिले यांनी 'जागतिक लोकसंख्या दिन' व ऍड. आर. डी. सोनकांबळे यांनी 'बालाधिकार' या विषयावर विचार मांडले. पर्यवेक्षक बैसठाकूर यांनी सूत्रसंचालन केले. मुख्याध्यापक शेख हैदर यांनी आभार मानले.

     पोलिस कर्मचारी गंगय्या दोनकलवार , न्यायालयाचे वरिष्ठ लिपिक मिसलवार, उप प्राचार्य सुभाष राऊत , उप मुख्याध्यापक जुमाखान पठाण, प्रा. घुगे आदिंसह बहुसंख्य शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.

     

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News