विष्णुपुरी प्रकल्पाचा व बळेगाव उच्च पातळी बंधाऱ्याचा एक दरवाजा उघडणार - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Saturday, July 23, 2022

विष्णुपुरी प्रकल्पाचा व बळेगाव उच्च पातळी बंधाऱ्याचा एक दरवाजा उघडणार

 


नांदेड : आज शनिवारी ( ता. 23 जुलै )   रात्री 11:00 वाजता डॉ. शंकररावजी चव्हाण विष्णुपुरी प्रकल्पाचा एक दरवाजा उघडण्यात येणार असल्यामुळे  बळेगाव उच्च पातळी बंधाऱ्याच्या पाणी पातळीत वाढ होणार आहे, म्हणून बळेगाव बंधाऱ्याचे दोन दरवाजे शनिवारी ( ता. 23 जुलै ) रात्री 11:00  वाजता उघडून नदीपात्रात पाणी सोडण्यात येणार आहे.

        तरी गोदावरी नदीकाठावर असणाऱ्या सर्व गावांतील नागरिकांनी व शेतकऱ्यांनी मालमत्तेची, जीविताची, पशुधनाची, वीटभट्टी साहित्य व  इतर कोणतीही हानी होणार नाही, याची दक्षता घ्यावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

बळेगाव उच्च पातळी बंधाऱ्याच्या पाणी पातळीत वाढ 

▪️बंधाऱ्याचा एक दरवाजा आज उघडला

 

नांदेड (जिमाका) ता. 23: बळेगाव उच्च पातळी बंधाऱ्याच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने आज बंधाऱ्याचा एक दरवाजा आज उघडला असून पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडला आहे. 


बळेगाव उच्च पातळी बंधाऱ्याच्या खालील बाजूस असणाऱ्या सर्व गावांतील नागरिकांच्या / शेतकऱ्यांच्या मालमत्तेची, जीविताची, पशुधनाची, वीटभट्टी साहित्य, इतर कोणतीही हानी होणार नाही, यासाठी काळजी घेण्याची आवाहन जिल्हा प्रशासनाने केले. 


No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News