शिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया -शिक्षण निरीक्षक नवनाथ वणवे - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers


Saturday, July 30, 2022

शिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया -शिक्षण निरीक्षक नवनाथ वणवे

 मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : शिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. शिक्षक या प्रक्रियेतील महत्त्वाचा घटक असे प्रतिपादन मुंबई पश्चिम शिक्षण विभागाचे शिक्षण निरीक्षक नवनाथ वणवे यांनी केले. मुंबई के पश्चिम विभागातील शाळांना शिक्षण अधिकारी वणवे सरांनी भेटी दिल्या व शिक्षकांना मार्गदर्शन केले.

कोविड 19 च्या प्रादुर्भाव संपल्यावर राज्यातील शाळा पुर्णपणे सुरळीतपणे चालू झाल्या आहेत. शिक्षण, विद्यार्थी व शिक्षण अधिकारी यांच्यात सुसंवाद साधण्यासाठी हा दौरा असल्याचे शिक्षण अधिकारी नवनाथ वणवे यांनी आमच्या प्रतिनिधींना सांगितले. मुंबईतील हंसराज मोरारजी पब्लिक स्कूल अंधेरी येथील शाळेतील तंत्रज्ञान व विज्ञान व तंत्रज्ञान, प्रयोग शाळा, जीम तसेच विद्यार्थ्यांसाठी उभारलेल्या साहसी क्रीडा उपक्रमास शिक्षण अधिकाऱ्यांनी भेटी दिल्या.

शाळा हे विद्यार्थ्यांचे व्यक्तीमत्व घडवत असते व यातूनच उद्याचा देश घडत असतो. यामुळे शिक्षकांनी उपलब्ध असलेल्या साधन सामुग्रीवर कोणत्याही प्रकारच्या तक्रारींचा सुर न आवळता विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला पाहिजे असा सल्ला शिक्षक वर्गाला दिला. यावेळी शाळेचे प्रशासकीय अधिकारी निवृत्त मेजर जनरल दीपक सक्सेना, शाळेचे मुख्याध्यापक गोविंदराजन श्रीनिवासन सर व मुख्य सुरक्षा अधिकारी मधुकर खोत उपस्थीत होते.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News