... नागरिकांनो सावधान ! किनवटमध्ये आज आढळले 20 कोरोना बाधित - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers


Saturday, July 30, 2022

... नागरिकांनो सावधान ! किनवटमध्ये आज आढळले 20 कोरोना बाधित

किनवट   : उप जिल्हा रुग्णालय , गोकुंदा येथून तपासणीसाठी पाठविलेल्या स्वॅबचा शनिवार ता. 30 जुलै 2022 रोजी सायंकाळी 7.27 वाजता प्राप्त झालेल्या कोरोना अहवालानुसार तालुक्यात 17 जण व लगतच्या यवतमाळ जिल्ह्यातील 3 जण असे एकूण 20 बाधित आढळले आहेत. 


       उप जिल्हा रुग्णालय , गोकुंदा येथे " ताप तपासणी स्वतंत्र कक्ष " स्थापन करण्यात आला आहे. 10 गावातील रुग्णांचे स्वॅब तपासणी साठी नांदेडला पाठविले होते. त्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्यानुसार आजचे  बाधित हे गोकुंदा येथील 7 वर्षाचा 1 मुलगा , 40 वर्षाचा 1 पुरुष , दत्तनगर येथील 12 वर्षाचा 1 मुलगा , बिलालनगर येथील 55 वर्षाचा 1 पुरुष ,  किनवट मधील समतानगर येथील 17 वर्षाचा 1 युवक व 16 वर्षाची 1 मुलगी , नालागड्डा येथील 32 वर्षाची 1 महिला , इस्लामपूरा येथील 30 वर्षाचा 2 महिला , शिवशंकर नगर येथील 23 वर्षाचा 1 पुरुष , लोणी येथील 60 वर्षाचा 1 पुरुष व 60 वर्षाची 1 महिला , कोठारी येथील 49 वर्षाची 1 महिला , कमठाला येथील 52 वर्षाचा 1 पुरुष , दहेगाव येथील 24 वर्षाचा 1 पुरुष , बेंदीतांडा  येथील 20 वर्षाचा 1 पुरुष व यवतमाळ जिल्ह्यातील 3 जण आहेत.

           गृह विलगीकरणात (होम क्वारंटाईन ) असलेल्या या सर्व 20 रुग्णांवर औषधोपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. जनतेंनी घाबरू नये, शासनाच्या व आरोग्य विभागाच्या सूचना पाळाव्या, असे आवाहन वैद्यकीय अधिक्षक डॉ. उत्तम धुमाळे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुरमुरे यांनी केले आहे.किनवट उप विभागातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत सहभाग घ्यावा. याचबरोबर मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी कीर्तिकिरण एच. पुजार यांनी केले आहे. 

        आता सर्व विभागांच्या कार्यालयीन यंत्रणांनी सतर्क राहून समन्वयाने काम करावे. संशयितांचे व बाधितांचे स्वॅब तातडीने तपासणीसाठी पाठवावेत. लसीकरणासाठी सर्वांनी पुढे यावे. असे आवाहन तहसिलदार डॉ. मृणाल जाधव यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News