“‘घी देखा लेकीन कोल्हापुरी जोडा नही देखा’ असे जर असेल तर त्यांना कोल्हापुरी जोडे सुद्धा दाखवण्याची वेळ आली,” -उद्धव ठाकरे यांचा राज्यपालांवर हल्ला - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers


Saturday, July 30, 2022

“‘घी देखा लेकीन कोल्हापुरी जोडा नही देखा’ असे जर असेल तर त्यांना कोल्हापुरी जोडे सुद्धा दाखवण्याची वेळ आली,” -उद्धव ठाकरे यांचा राज्यपालांवर हल्लामुंबई : वादात सापडणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज आणखीन एक खळबळजनक वक्तव्य करत राज्यात नवीन वादाला तोंड फोडले आहे. राज्यपालांच्या त्या वक्तव्यावर चोहोबाजूनी टीका होत असताना शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांवर घणाघात केला आहे. “‘घी देखा लेकीन कोल्हापुरी जोडा नही देखा’ असे जर असेल तर त्यांना कोल्हापुरी जोडे सुद्धा दाखवण्याची वेळ आली आहे,” या शब्दात ठाकरे यांनी राज्यपालांवर हल्ला केला आहे.

त्यांनी नमकहरामी केली आहे. महाराष्ट्राची एक संस्कृती आहे. ही सगळी संस्कृती त्यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल झाल्यापासून पाहिली असेल. आता त्यांना कोल्हापुरातील वहाण दाखवण्याची गरज आहे.”


ठाकरे शैलीत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, ” कोल्हापुरी वहाण हे जगप्रसिद्ध आहे. त्याचा अर्थ काय लावायचा तो तुम्ही लावा. मी त्यावर बोलणार नाही. पण महाराष्ट्रातील कष्टकरी लोकांनी तो तयार केला आहे. कोल्हापुरी जोड्याचा उपयोग कसा करतात. त्यातही वेगवेगळे प्रकार आहेत. ‘घी देखा लेकीन कोल्हापुरी जोडा नही देखा’ असे जर असेल तर त्यांना कोल्हापुरी जोडे सुद्धा दाखवण्याची वेळ आली आहे.”


ठाकरे म्हणाले “कोश्यारींनी हिंदूमध्ये फूट पाडण्याचे काम केले आहे. त्यामुळे राज्यापालांना घरी पाठवायचे की त्यांना तुरुंगात पाठवायचे हा विचार करण्याची गरज आहे. मराठी व्यक्तींसोबतच अमराठी माणसेही चिडलेली आहेत. कोश्यारी यांनी महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे.”

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News