जिल्ह्यात 91 % विद्यार्थ्यांनी दिली 5 वी व 8 वीची शिष्यवृत्ती परीक्षा -शिक्षणाधिकारी(प्रा) डॉ. सविता बिरगे - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Monday, August 1, 2022

जिल्ह्यात 91 % विद्यार्थ्यांनी दिली 5 वी व 8 वीची शिष्यवृत्ती परीक्षा -शिक्षणाधिकारी(प्रा) डॉ. सविता बिरगे

 



नांदेड : जिल्ह्यात पूर्व प्राथमिक इयत्ता पाचवी व इयत्ता आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेस विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळाला असून एकूण 29,365 विद्यार्थ्यांपैकी 27,123  विद्यार्थ्यांनी आज परीक्षा दिली. परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे  हे प्रमाण 91 टक्के असल्याची माहिती प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे यांनी दिली.

       परिक्षेचे नियोजन प्रश्नपत्रिकांचे वितरण आणि परीक्षा दरम्यानची कार्यवाही या संदर्भाने दोन दिवसापूर्वी मल्टीपर्पज हायस्कूल येथे सर्व केंद्र संचालकांची बैठक घेण्यात आली होती. इयत्ता पाचवीसाठी 181 केंद्रावर तर आठवीसाठी 107 केंद्रांवर अशा 288 केंद्रामध्ये परीक्षा पार पडली. इयत्ता पाचवीसाठी एकूण विद्यार्थी 17,199 होते. त्यापैकी 15,583 विद्यार्थी उपस्थित राहिले. इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी 15,573 विद्यार्थ्यांपैकी 12,613 विद्यार्थी पहिल्या पेपरला तर दुसऱ्या पेपरला 11,542 विद्यार्थी उपस्थित राहिले. इयत्ता पाचवी ते आठवीचे  विद्यार्थ्यांचे उपस्थितीचे प्रमाण 91 टक्के असे आहे.

       शिक्षणाधिकारी डॉ.सविता बिरगे यांनी अनेक केंद्रांना भेटी देऊन परीक्षेची पाहणी केली. सर्व परीक्षा व्यवस्थित पार पाडण्यासाठीचे नियोजनात उप शिक्षणाधिकारी बंडू अमदुरकर, गट शिक्षणाधिकारी संतोष शेटकार, उत्तम पेठकर, संजय भालके, आकाश गाडगेराव, प्रवीण सूर्यवंशी, मनोज कोटलवार,गुणवंत टेकाळे आदींनी केले होते.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News