उत्कृष्ट शैक्षणिक आलेख असलेला व्यक्ती प्राचार्य म्हणून लाभल्याचे समाधान -प्रफुल्ल राठोड - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers


Monday, August 1, 2022

उत्कृष्ट शैक्षणिक आलेख असलेला व्यक्ती प्राचार्य म्हणून लाभल्याचे समाधान -प्रफुल्ल राठोड

 


 माहूर :   गेल्या साडेतीन वर्षांच्या काळात आमच्या महाविद्यालयास प्रोफेसर डॉ. नल्ला जगनमोहन रेड्डी यांच्या रूपाने विद्यापीठ स्तरावरील उत्कृष्ट शैक्षणिक कार्य असलेले प्राचार्य मिळाल्याचे समाधान आहे.  असे गौरवोद्गार बळीराम पाटील मिशन मांडवीचे संस्थापक अध्यक्ष  प्रफुल्ल राठोड यांनी व्यक्त केले. ते ३१ जुलै २०२२ रोजी बळीराम पाटील मिशन मांडवी संचलित श्री रेणुकादेवी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नल्ला जगनमोहन रेड्डी यांच्या सेवानिवृत्तीनिमीत्त आयोजित सत्कार समारंभात अध्यक्षीय समारोपप्रसंगी बोलत होते.

    डॉ. रेड्डी श्री रेणुकादेवी महाविद्यालयात प्राचार्य म्हणून रूजू होण्यापूर्वी कंधार येथील श्री शिवाजी महाविद्यालयात वनस्पतीशास्त्राचे सहायक प्राध्यापक होते. तसेच रीडर म्हणून त्यांनी ३० वर्ष सेवा दिलेली आहे.  राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय  चर्चा सत्रात  त्यांचे जवळपास ४० लेख प्रकाशित झालेले आहेत. तसेच डॉ. रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली ०५ विद्यार्थ्यांनी पी.एच.डी. तर ०३ विद्यार्थ्यांनी एम. फिलची पदवी प्राप्त केलेली आहे. त्यांच्या कार्यकाळात महाविद्यालयाचे नॅक मूल्यांकन झाले आहे. अशा प्राचार्यांचा महाविद्यालयाच्या वतीने सपत्नीक आहेर, भेटवस्तू देऊन  गौरव करण्यात आला. तसेच उपस्थितांनीही आपल्या भावना शाल , श्रीफळ, बुके, हार, व भेटवस्तूंच्या माध्यमातून व्यक्त केल्या. 

     यावेळी  प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेच्या सचिव संध्याताई राठोड, संस्थेचे स्थानिक सल्लागार समिती सदस्य सुलेमानजी फारूखी,  रऊफभाई सौदागरजी, सरस्वती विद्या मंदिर महाविद्यालय किनवटचे प्राचार्य डॉ. आनंद भंडारे, श्री शिवाजी महाविद्यालय कंधारचे प्राचार्य डॉ. गिरमाजी पगडे, डॉ. अब्दुल कासार , डॉ. दिलीप सावंत ह्या मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांची समयोचित भाषणे झाली.

    कार्यक्रमास  डॉ. पांडुरंग पांचाळ, बळीराम पाटील महाविद्यालय किनवटचे प्रा.डॉ. राजकुमार नेम्माणीवार ,प्रा. डॉ. जी.बी.लांब, प्रा.डॉ. एस.आर. शिंदे , प्रा.डॉ. विजय उपलेंचवार, प्रा.डॉ. आर.एम. कदम, प्रा. रिजवान पठाण, प्रा. अब्रार खान, प्रा.डॉ. बाबुराव कमले, ग्रामीण रुग्णालय माहूर येथील शिवाजी साळुंखे रविकांत सालमे यांची उपस्थिती होती.

   महाविद्यालयाच्या वतीने प्रा.डॉ. दत्ता जाधव यांनी प्रातिनिधिक मनोगत व्यक्त केले, संशोधक विद्यार्थ्यांतर्फे अहमदपूर येथील महात्मा गांधी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. आर.एम.कदम यांनी तर नातेवाईकांतर्फे डॉ. रमण्णा रेड्डी यांनी मनोगत व्यक्त केले.

    सत्कार समारंभात बोलताना सत्कारमूर्ती डॉ. रेड्डी यांनी प्राचार्य पदी कार्य करण्याची संधी दिल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष, सचिव व पदाधिकारी यांना धन्यवाद दिले. 

      उपप्राचार्य डॉ. राजेंद्र लोणे यांनी सूत्रसंचालन केले.  डॉ. तुळशीदास गुरनुले यांनी आभार मानले. 

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News