ग्रामीण भागातील 1 लाख 50 हजार घरांवर महिलांच्या हस्ते तिरंगा फडकणार..! ▪️MSRLM जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्‍हा परिषदेच्‍या वतीने जोरदार तयारी ▪️नांदेड जिल्हा परिषदेच्या सीईओ वर्षा ठाकूर घुगे यांचा स्वंय सहायता समूहाशी ऑनलाईन महासंवाद - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Monday, August 1, 2022

ग्रामीण भागातील 1 लाख 50 हजार घरांवर महिलांच्या हस्ते तिरंगा फडकणार..! ▪️MSRLM जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्‍हा परिषदेच्‍या वतीने जोरदार तयारी ▪️नांदेड जिल्हा परिषदेच्या सीईओ वर्षा ठाकूर घुगे यांचा स्वंय सहायता समूहाशी ऑनलाईन महासंवाद

 



नांदेड  ता. 01: स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या हर घर तिरंगा उपक्रमाबाबत नांदेड जिल्‍हयातील ग्रामीण भागातून  पाच लाख घरांवर तिरंगा फडकवणार  असून किमान 1 लाख 50 हजार महिला आपल्या घरावर स्वतः राष्ट्रध्वज लावून राष्ट्राला अनोखी सलामी देणार असल्याची माहिती  नांदेड जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिली आहे.


भारतीय स्‍वातंत्र्याला यंदा 75 वर्ष पूर्ण होत आहेत. या पार्श्‍वभूमीवर नागरिकांच्‍या मनात स्‍वातंत्र्याच्‍या आठवणी उजळून निघाव्‍यात तसेच स्‍वातंत्र्य लढ्याच्याया स्‍मृती तेवत राहाव्‍यात यासाठी हर घर तिरंगा मोहीम राबविण्‍यात येत आहे. या उद्देशाने आपल्या वैभवशाली इतिहासाचे अभिमानपूर्वक स्मरण करण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत हर घर तिरंगा उपक्रम राबवण्यात येणार आहे. यानिमित्‍त आज झूम मिटिंगव्‍दारे मुख्‍य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी ग्रामीण भागातील महिला स्वंय सहायता समूहातील सदस्यांशी संवाद साधला. यावेळी अतिरिक्‍त मुख्‍य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय तुबाकले, जिल्हा अभियान व्यवस्थापक गजानन पातेवार व जिल्हा व्यवस्थापक गणेश कवडेवार यांची उपस्थिती होती.


तिरंगा फडकवतांना  तिरंग्याचा कुठेही अपमान होऊ नये याची मात्र आपल्याला काळजी घ्यायची आहे. राष्ट्रीय ध्वज हा  हाताने कातलेला, विणलेला अथवा मशीनव्‍दारे तयार केलेला  कापडी, खादी, पॉलिस्टर किंवा लोकरीपासून तयार केलेला असावा. प्लास्टिक किंवा कागदी झेंडा फडकवू नये. तिरंग्याचा आकार हा 3:2 या प्रमाणात राहील असा असावा. तिरंग्याचा केशरी रंग हा वरच्या बाजूला आणि हिरवा रंग हा खालच्या बाजूला असावा. राष्ट्रध्वज स्तंभाच्या वरच्या टोकाला लावावा. त्या ध्वजावर इतर कोणताही ध्वज सोबत लावू नये.  राष्ट्रध्वजावर कोणतेही अक्षर किंवा चिन्ह लिहू नये तसेच स्तंभाच्या वर आणि आजूबाजूला काहीही लावू नये. राष्ट्रध्वज कुठल्याही प्रकारे फाटलेला मळलेला अथवा चुरगळलेला असू नये. तसेच राष्ट्रध्वजाचा कुठल्याही प्रकारे तोरण, गुच्छ अथवा पताका म्हणून वापर करू नये. ध्वज फाटणार नाही याची काळजी घ्यावी. राष्ट्रध्वज उतरताना पूर्ण सन्मानाने आणि सावधतेने उतरवावा. राष्ट्रध्वज उतरल्यानंतर त्याची व्यवस्थित घडी करून सुरक्षित ठिकाणी ठेवावा. आपला राष्ट्रध्वज तिरंगा हा आपला अभिमान आणि अस्मिता असल्‍याचेही  वर्षा ठाकूर-घुगे म्‍हणाल्‍या.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News