सेवानिवृत्ती निमित्त मुख्याध्यापक दिगांबर बिच्चेवार यांना निरोप - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers


Monday, August 1, 2022

सेवानिवृत्ती निमित्त मुख्याध्यापक दिगांबर बिच्चेवार यांना निरोप

 


 किनवट : कॉस्मॉपॉलिटन विद्यालयाचे मुख्याध्यापक दिगांबर बिच्चेवार हे सोमवारी (ता. 31) नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्याने विशेष समारंभात त्यांना सपत्नीक  निरोप देण्यात आला.

       ज्येष्ठ शिक्षक आर. व्ही. घोरबांड अध्यक्षस्थानी होते. याप्रसंगी संस्थेचे सचिव पी. व्ही रामतिर्थकर, अध्यक्ष एन.व्ही रामतिर्थकर, ज्येष्ठ शिक्षक बी. एस. मोहिते, प्रिती रामतिर्थकर, एस.बी गज्जलवार, वाय.एम.राठोड, पी.आर कदम, आर.आर. बारापात्रे, एस. डी बामणीकर आदी मान्यवर उपस्थित होते. 

      श्री बिच्चेवार यांनी 35 वर्षे प्रदीर्घ सेवा केली. या काळात शाळेला अच्छे दिन आले. ते शारीरिक शिक्षक म्हणून  तालुक्यात प्रसिद्ध होते. निर्भीड व्यक्तिमत्व, समयसूचकता, सडेतोडपणा हे त्यांचे विशेष. याच कार्यक्रमाचं औचित्य साधून शालांत प्रमाणपत्र परीक्षेत प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा शाळेतर्फे पारितोषिक देऊन सहपरिवार सत्कार करण्यात आला. व्ही. एम. पुराणिक यांनी सूत्रसंचालन केले. परिचय व कार्य गौरव  बाळकृष्ण कदम यांनी केला.  आर.एन बोलेनवार यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व कर्मचारीवर्गाने परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News