पुण्यात उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers


Tuesday, August 2, 2022

पुण्यात उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला

 


पूणे (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला झाल्यानंतर महाराष्ट्रात राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे.    

        शिवसेना युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची शिवसंवाद यात्रा महाराष्ट्राच्या कोकण दौऱ्यावर आहे. कोकण दौऱ्यावरून ते कोल्हापूर व कोल्हापूर मार्गे पुणे या ठिकाणी गेले असता त्या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एक सभा होती. या सभेतूनच एकनाथ शिंदे गटाचे नेते माजी मंत्री उदय सामंत जात असताना युवा सैनिकांनी एकच गदारोळ केला आणि एक दगड उदय सामंत यांच्या गाडीवर भिरकावला. उदय सामंत यांची गाडीची काच या दगडफेकीत फुटली पण सुदैवाने उदय सामंत यांना कोणतीही इजा झालेली नाही. घटनास्थळी असलेल्या पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून उदय सामंत यांचा मार्ग मोकळा करून दिला . 

        या प्रकारानंतर पुण्यात राजकीय मात्र चांगले तापलेले. महाराष्ट्रातील मंत्रिमंडळाची स्थापना अद्याप झाली नाही. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली आहे व त्यांची चौकशी चालू आहे. चार ऑगस्ट पर्यंत चौकशी होईल कदाचित त्याला मुदत वाजवून न्यायालयीन  चौकशी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे शिवसैनिक चांगले संतापलेले आहेत. मुंबई अत्यंत कडक बंदोबस्त  असला तरी पुण्याच्या प्रकारानंतर राज्यातील इतर ठिकाणचे शिवसैनिक आक्रमक होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे गट कोणती पावले उचलतील याच्याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी या संदर्भात आपणास काहीच माहिती नसल्याचे प्रसार माध्यमांना सांगितले आहे. रस्यावर उतरलेले शिवसैनिक गद्दारांना क्षमा नाही त्यांना धडा शिकवला जाईल अशा घोषणा देत रस्त्यावर आक्रमक झालेले दिसत होते.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News