शासकीय आय.टी.आय येथे 20 ट्रेडसाठी 724 जागा उपलब्ध ▪️विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers


Tuesday, August 2, 2022

शासकीय आय.टी.आय येथे 20 ट्रेडसाठी 724 जागा उपलब्ध ▪️विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी

 


नांदेड (जिमाका) ता.2 : व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या वतीने आय.टी.आय  प्रवेश प्रक्रियेस सुरुवात झाली आहे.


औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदेड येथे प्रवेश प्रक्रियेस सुरुवात होऊन विविध ट्रेडला प्रवेश घेण्याकरिता ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावयाचे आहेत. ऑनलाईन प्रवेश अर्ज भरून प्रवेश फाॅर्म निश्चिती करने, प्रवेश फाॅर्म त्रुटी सुधारने, प्रवेश फिस भरने या बाबी प्रवेश प्रक्रियेत आहेत. आय.टी.आय नांदेड येथे 20 ट्रेडसाठी 724 जागा उपलब्ध असून याचा लाभ पात्र विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन प्राचार्य एम.एस.बिरादार यांनी परिपत्रकाद्वारे केले आहे. 


हे आहे संकेतस्थळ

https//.admission.dvet.gov.in   या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज रितसर भरावा. 

                                                          *प्रवेश अर्ज निश्चित करणे*                                       प्रवेश अर्ज निश्चित करण्यासाठी उमेदवाराने प्रवेश अर्जातील माहिती दाव्यांचा पृष्ठयर्थ आवश्यक मुळ दस्तावेज,कागदपत्रे,कागदांच्या छायांकित प्रतीचा एक संच व तात्पुरत्या प्रवेश अर्जाची छापील प्रत औ.प्रशिक्षण संस्थेत पडताळणीसाठी वेळापत्रकानुसार दाखल करावेत.उमेदवारांनी व पालकांनी ऑनलाईनवर देण्यात आलेली माहिती,प्रवेश पद्धती व नियमांचा अभ्यास करूनच प्रवेश अर्ज सादर करावा.


हे आहेत ट्रेड

फिटर/पेंटर जनरल/बेसिक काॅस्मॅटोलाॅजी/सुईंग टेक्नॉलॉजी/शिट मेटल/टुल अॅड डायमेकर/टर्नर/वेल्डर/वायरमन/फाॅड्रीमॅन/मशिनीस्ट/ट्रॅक्टर मेकॅनिक/ईलेक्ट्रशीयन/ड्राफ्सटमन सिव्हिल/ड्राफ्सटमन मेकॅनिकल/ईलेक्ट्रशीयन/ईलेक्ट्राॅनिक्स मेकॅनिक/मोटर मेकॅनिक.


आयटीआय प्रवेश प्रक्रिया प्राचार्य एम.एस.बिरादार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवेश समिती प्रमुख:- सुभाष परघणे,  उपप्रमुख:-रविंद्र वानखेडे,  केदार गिरीश, सचिन रा.का,संजीवनी जाधव,  प्रकाश मांजरमकर, गरूडकर,प्रकाश बानाटे हे काम पाहत आहेत.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News