जिल्हा परिषदेअंतर्गत 33 अनुकंपा कर्मचाऱ्यांना वर्ग- 4 च्या पदावरून वर्ग- 3 पदावर सीईओ तथा प्रशासक वर्षा ठाकूर-घुगेंनी दिले फेरनियुक्तीचे आदेश - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Thursday, August 4, 2022

जिल्हा परिषदेअंतर्गत 33 अनुकंपा कर्मचाऱ्यांना वर्ग- 4 च्या पदावरून वर्ग- 3 पदावर सीईओ तथा प्रशासक वर्षा ठाकूर-घुगेंनी दिले फेरनियुक्तीचे आदेश



नांदेड : जिल्हा परिषदे अंतर्गत 33 अनुकंपा कर्मचाऱ्यांना वर्ग- 4 च्या पदावरून वर्ग- 3 पदावर आज फेरनियुक्तीचे आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक वर्षा ठाकूर-घुगे यांनी  दिल्या आहेत. 

     यापूर्वी जिल्हा परिषदेमध्ये सदर  कर्मचाऱ्यांना परिचर वर्ग 4 म्हणून नियुक्त्या देण्यात आल्या होत्या. आता वर्ग 3 प्रवर्गातील रिक्त झालेल्या पदांवर त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार 33 कर्मचाऱ्यांना आज फेरनियुक्तीने नेमणुका देण्यात आल्या आहेत. यात अंगणवाडी पर्यवेक्षिका पदी-1, वरिष्ठ सहाय्यक- 4, कनिष्ठ सहाय्यक -18, वरिष्ठ सहाय्यक लेखा- 2,  कनिष्ठ सहाय्यक लेखा- 6   तर आरोग्य सेवक पदी 2 अशा एकूण 33 कर्मचाऱ्यांना आज जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते फेर नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय तुबाकले, उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर ठोंबरे, डॉ. नामदेव केंद्रे, व्ही. आर. पाटील यांच्यासह सर्व खाते प्रमुख यांची उपस्थिती होती. यावेळी अनुकंपा कर्मचाऱ्यांना पदोन्नती दिल्याबद्दल कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांचे पुष्पहार अर्पण करून प्रशासनाचे आभार मानले. या वेळी पदोन्नत कर्मचाऱ्यांनी देखील आनंद व्यक्त केला.


अनुकंपांमधून आपल्याला शासकीय सेवेत सेवा करण्याची संधी मिळाली आहे. कर्मचाऱ्यांनी आपल्या कामाच्या माध्यमातून नाव कमवावे. कामाप्रती चोखंदळ राहून चांगल्या कामातून लौकिक मिळवावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर- घुगे यांनी केले.




नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे ह्या कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सदैव पाठपुरावा करत असतात. त्यांचा पाठपुराव्यामुळेच आज 33 अनुकंपा कर्मचाऱ्यांना फेरनियुक्तीने पदोन्नत्या मिळाल्या आहेत.  अनुकंपा कर्मचाऱ्यांना फेरनियुक्त देण्यामध्ये नांदेड जिल्हा परिषदेमधील ही ऐतिहासिक घटना असल्याचे मत जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे बाबुराव पुजरवाड यांनी व्यक्त केले. प्रशासनाने पाठपुरावा करून कर्मचाऱ्यांना फेरनियुक्त दिल्याबद्दल जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांचे पुजरवाड यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News