छात्र वैज्ञानिकांच्या नाविण्यपूर्ण प्रयोगांनी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन बहरले - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Tuesday, September 6, 2022

छात्र वैज्ञानिकांच्या नाविण्यपूर्ण प्रयोगांनी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन बहरले

 



किनवट : शिक्षण विभाग पंचायत समिती, किनवट व महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, गोकुंदा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 49 वे  तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन  " छात्र वैज्ञानिकांच्या नाविण्यपूर्ण प्रयोगांनी  बहरले.
       यावेळी गट शिक्षणाधिकारी अनिल महामुने, केंद्र प्रमुख रमेश राठोड, मानव विकास समन्वयक उत्तम कानिंदे, प्राचार्य शेख हैदर, उप प्राचार्य सुभाष राऊत, उप मुख्याध्यापक जुम्माखान पठाण हे प्रमुख अतिथी उपस्थित होते.
       अंबादास जुनगरे यांनी सूत्रसंचालन केले. सुरेंद्र पाटील यांनी आभार मानले. या स्पर्धेसाठी कनिष्ठ महाविद्यालयाचे अध्यापक  विनोद कांबळे, आजेगावकर व तम्मेवार यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले. तालुक्यातील विविध शाळेतील उच्च प्राथमिक गटातून 43 व माध्यमिक व उच्च माध्यमिक गटातून 25 वस्तूंचे प्रदर्शन मांडले होते.



     यावेळी तालुकास्तरीय निकाल पुढील प्रमाणे : 1. उच्च प्राथमिक विभाग : प्रथम :   सतिष भावेश जाधव, जि.प. हा. कोसमेट , प्रदर्शन वस्तुचे नाव : वन्यजीव संरक्षण यंत्र , मार्गदर्शक शिक्षक : बी. आर. गालचेलवार , व्दितीय : हर्षल प्रेम तांदळे , मातोश्री कमलताई ठमके इंग्लीश स्कुल, कोठारी, प्रदर्शन वस्तुचे नाव : Production of Electricity   from speed Breaker , मार्गदर्शक शिक्षक : संतोष, तृतीय : प्रशिक गौतम देवतळे , म.ज्यो.फुले विद्यालय गोकुंदा, प्रदर्शन वस्तुचे नाव : बहुउद्देशिय सुक्ष्मदर्शिका , मार्गदर्शक शिक्षक : जी. के. श्रीमंगल, चतुर्थ : राजकन्या राजु केंद्रे , सुमतीबाई हेमसिंग नाईक कन्या मा. वि., किनवट ,
प्रदर्शन वस्तुचे नाव : Rain water Harvesting, मार्गदर्शक शिक्षक : निलेश भिलवीडकर , 2. माध्यमिक व उच्च माध्यमिक विभाग प्रथम : वल्लभ संतोष रायेवार, म.ज्यो . फुले विद्यालय गोकुंदा
प्रदर्शन वस्तुचे नाव : Li - Fi, मार्गदर्शक शिक्षक : पाटील एस.एच., द्वितीय : ऋतीक बाबुलाल पवार, अशोक पब्लिक स्कूल, ( इंग्लीश मेडीयम), पळशी, प्रदर्शन वस्तुचे नाव :  Aquaphonic Farming, मार्गदर्शक शिक्षक : काजल राठोड, तृतीय : पार्थ मनोज भोयर, म.ज्यो. फुले विद्यालय गोकुंदा , प्रदर्शन वस्तुचे नाव : गवत कापणी यंत्र, मार्गदर्शक शिक्षक : जुनगरे ए.पी., चतुर्थ : प्रगती गंगाचरण मज्जरवार, जि.प. हा. शिवणी, प्रदर्शन वस्तुचे नाव : पर्यावरण अनुकुल सामग्री, मार्गदर्शक शिक्षक : श्रीमती इनामदार एच.एच., 3. प्रयोगशाळा सहायक / परिचर प्रथम : सुरेश आनंदराव मेश्राम, जि.प. हा. कोसमेट, प्रदर्शन वस्तुचे नाव : उपयुक्त औषधी वनस्पती

" विद्यार्थ्यांनो जग बदलण्याची ताकद विज्ञानात आहे. या विज्ञानाच्या माध्यमातून जगात भारताचा वेगळा ठसा उमटवावा.
-अनिल महामुने,
गट शिक्षणाधिकारी, किनवट "

       कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी पर्यवेक्षक किशोर डांगे, प्रमोद मुनेश्वर, प्रशांत डवरे, प्रज्ञा पाटील, अंजली हलवले, जी. के. श्रीमंगल, विकास गवळे, गजानन भगत , सतीष विणकरे , श्याम जायभाये , संदेश भरणे , सुरेश इटकेपेल्लीवार, खांडरे व देवतळे यांनी परिश्रम घेतले.



No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News