यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे नांदेड विभागीय केंद्रामार्फत विभागीय युवक महोत्सवाचे आयोजन - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers


Sunday, September 11, 2022

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे नांदेड विभागीय केंद्रामार्फत विभागीय युवक महोत्सवाचे आयोजन

 


नांदेड : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामध्ये प्रवेशित विद्याथ्र्यांसाठी विभागीय केंद्रांच्या स्तरावर विभागीय युवक महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. या शैक्षणिक वर्षात विभागीय केंद्र, नांदेड यांचेमार्फत शनिवार, दिनांक २४ सप्टेंबर २०२२ रोजी विभागीय केंद्र, नांदेड कार्यालयात विभागीय युवक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या युवक महोत्सवात नांदेड, लातूर, हिंगोली, परभणी जिल्ह्यांमधील अभ्यासकेंद्रावर प्रवेशित विद्यार्थ्यांनी संख्येने सहभागी होऊन आपल्या अंगी असलेल्या कलागुणांचा अविष्कार करावा. ज्या विद्यार्थ्याचे वय २५ पेक्षा कमी आहे अशा विद्यार्थ्यांना खालील कलाप्रकारात सहभाग नोंदविता येईल.


 या युवक महोत्सवात विविध कलागुणांचा अविष्कार होणार आहे. शास्त्रीय गायन: भारतीय / कर्नाटकी, शास्त्रीय वाद्य संगीत (स्वरवाद्य), शास्त्रीय वाद्य संगीत

. नृत्य विभाग(तालवाद्य), पाश्चिमात्य समुहगान, लोकसंगीत वाद्यवृंद. द लोक / आदिवासी नृत्य, शास्त्रीय नृत्य (भारतीय). वाडमयिन कला विभाग . रंगमंचीय कला विभाग

ललितकला विभाग: प्रश्नमंजुषा (Quiz), वकृत्व स्पर्धा (Elocution), वादविवाद स्पर्धा (Debate). : एकांकिका (One Act Play), प्रहसन (Skit ), मुकनाट्य (Mime).नकला (Mimicry)स्थळचित्र, पोस्टर मेकिंग, चिकटकला, रांगोळी, स्थळ छायाचित्रण, मातोकला.
व्यंगचित्रे युवक महोत्सवात सहभागी विद्यार्थ्यांना सहभागाचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना नाशिक येथे होणाऱ्या केंद्रीय युवक महोत्सवामध्ये आपली कला सादर करता येणार आहे. जास्तीत जास्त विद्याथ्र्यांनी युवक महोत्सवात सहभाग नोंदवावा असे आवाहन नांदेड विभागीय केंद्रातील श्री. चंद्रकांत सुरेश पवार, सहायक कुलसचिव यांनी केलेले आहे.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News