शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासासाठी केली सहशालेय उपक्रमांची सुरुवात - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Thursday, September 15, 2022

शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासासाठी केली सहशालेय उपक्रमांची सुरुवात

 



मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : कोव्हीड 19 च्या प्रादुर्भावामुळे मागील दोन वर्षांमध्ये झालेला अध्ययन नुकसान भरून काढण्यासाठी आणि गुणवत्तेसाठी निश्चित करण्यात आलेली उद्दिष्टे टप्पे साध्य करण्यासाठी व सन 2022 - 2023 या शैक्षणिक वर्षातील शैक्षणिक उपक्रमांचे उत्कृष्ट नियोजन करणे आणि ते प्रभावीपणे राबविणे महत्त्वाचे ठरत आहे. या अनुषंगाने शैक्षणिक गुणवत्ते बरोबरच सहशालेय उपक्रम सुध्दा राज्यात राबवले जात आहेत.  शैक्षणिक वर्ष सन 2022 - 2023 अंतर्गत महत्त्वपूर्ण शैक्षणिक उपक्रम राबवण्यासाठी मार्गदर्शक सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत. 


शैक्षणिक गुणवत्ता वृध्दि वर्ष सन 2022 - 2023 अंतर्गत महत्त्वपूर्ण शैक्षणिक उपक्रम शाळा शाळांमध्ये राबविले जात आहेत. मुंबईतल्या हंसराज मोरारजी पब्लिक स्कूल या निवासी शाळेत सहशालेय उपक्रम राबविण्यात आला होता. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी एकपात्री अभिनय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. शिक्षण निरीक्षक नवनाथ वणवे यांनी आपल्या विभागातील अनेक शैक्षणिक संस्थांमधील मुख्याध्पक व शिक्षकांमध्ये संवाद साधून विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासासाठी उत्तमोत्तम स्पर्धांचे आयोजन करून शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये चैतन्य निर्माण केले. केवळ विद्यार्थीच नव्हे तर शिक्षक व प्रयोगशाळा सहाय्यक यांनी विज्ञान प्रदर्शनात सादर केलेले प्रकल्प कोव्हीड 19 नंतर उल्लेखनीय होते. या प्रदर्शनात प्रथम पुरस्कार प्राप्त हितेंद्र राठोड प्रयोग शाळा सहाय्यक यांचे  मुख्याध्यापक  गोविंदराजन श्रीनिवासन यांनी अभिनंदन केले. 



 विद्यार्थ्यांमध्ये मूलभूत क्षमता विकसित करणे. विद्यार्थ्यांत अध्ययन वृद्धी करण्यासाठी राज्य स्तरावरून शैक्षणिक उपक्रमांचे नियोजन करून अंमलबजावणी साठी मार्गदर्शन करणे यावर भर देण्यात येणार आहे. 

सहशालेय उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासासाठी फारच उपयुक्त ठरतील. वाचन संस्कृती जोपासण्यासाठी व मोबाईलपासून दूर राहण्यासाठी अशा स्पर्धा नेहमीच प्रेरणादायी ठरतील असे मत ग्रंथपाल आरती शर्मा यांनी व्यक्त केले. 

या स्पर्धेसाठी आर. सी. पटेल हायस्कूल मधील शिक्षिका  सीमा नलावडे व व सय्याली वैश्यफन्न यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News