किनवट : तालुक्यातील बोधडी (बु) येथे हेअर सलूनमध्ये दाढी करण्याचे पैसे देवघेवच्या कारणाने झालेल्या वादात हेअर सलून चालकाने धारदार वस्तर्याने ग्राहकाची हत्या केली. त्यानंतर मृताच्या नातेवाईकाने सलून चालकाचे दुकान घर जाळून त्यास भर बाजारात गाठून ठेचून खून केल्याच्या प्रकरणाने ग्रामपंचायत निवडणूकीच्या काळात दहशतीचे वातावरण पसरले आहे. प्रकरणाला ताबूत आणण्यासाठी चोख पोलिस बंदोबस्त केल्याने गावाला छावणीचे स्वरूप आले आहे.
याबाबत हाती आलेले वृत्त असे की , बोधडी (बुद्रूकू) येथे गुरुवारी (ता.१५ ) सायंकाळी व्यंकटी सुरेश देवकर ( वय २२ वर्षे ) हे दाढी करण्यासाठी अनिल मारुती शिंदे ( वय ४० वर्षे ) यांच्या बाजारपेठेत असलेल्या सलून मध्ये आले. आर्धी दाढी झाल्याने सलून मालकाने ग्राहकास पैशाची मागणी केली. यावरूनच त्या दोघांत वाद झाल्याचे समजते. वादातच अनिल शिंदे याने व्यंकटी देवकर याच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून त्याची हत्या केली. ही बातमी कळताच देवकरच्या नातेवाईक जमाव करून प्रथम अनिल मारुती शिंदे यांच्या मालकीचे सलूनचे दुकान जाळून टाकले व नंतर त्याचा शोध घेऊन त्याला गावाच्या भर मार्केटमध्ये ठेचून मारून खून केला व नंतर त्याचे घर जाळून टाकले.
या दुहेरी हत्याकांडानंतर जमावाने जाळपोळ केली. यात २ ते ३ दुकाने व २ घरे जळाल्याचे सांगण्यात आले. किनवट येथून अग्निशामक दलाचा बंब वेळेवर पोहोचल्याने पुढील अनर्थ टळला. या दुहेरी हत्याकांडाची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी विजय डोंगरे, पोलीस निरीक्षक अभिमन्यू साळुंखे फौजफाट्यासह बोधडीत दाखल झाले. येथील तणावपूूर्ण परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी किनवटसह मांडवी, सिंदखेड, इस्लापूर येथील पोलीस कुमकासह नांदेडचे जलद कृती दल व अन्य पथकास पाचारण करण्यात आले. या पोलिस तैनातीने बोधडी गावाला पोलीस छावणीचे स्वरुप आले. याबाबत अजून पोलिसात गुन्हा दाखल झालेला नाही याप्रकरणी पुढील तपास पोलीस करीत असल्याचे समजते.
बोधडी येथे ग्रामपंचायतची निवडणूक आहे. या निवडणुकीच्या धामधुमीत दुहेरी हत्तेमुळे दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
No comments:
Post a Comment