मंगळवारी भोकर तालुक्यात सरपंच आरक्षण निवडीचा कार्यक्रम ; जिल्हाधिकारी यांचे आदेश #डॉ.कैलास कानिंदे रेणापूरकर यांच्या प्रयत्नाला यश - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers


Friday, September 23, 2022

मंगळवारी भोकर तालुक्यात सरपंच आरक्षण निवडीचा कार्यक्रम ; जिल्हाधिकारी यांचे आदेश #डॉ.कैलास कानिंदे रेणापूरकर यांच्या प्रयत्नाला यश

 भोकर (जयभीम पाटील) :  तालुक्यामधील दहा गावाच्या सरपंच पदाच्या निवडीला अखेर मुहूर्त मिळाला आहे. सरपंच  पदाच्या आरक्षण निवडी संबंधी जिल्हाधिकारी यांनी आदेश काढले आहेत. मंगळवारी (ता.२७ सप्टेंबर) सरपंच पदाच्या आरक्षण निवडीचा कार्यक्रम जिल्हाधिकारी यांनी जाहीर केला आहे .
       तालुक्यातील रिक्त सरपंच पदाचे आरक्षण लवकर व्हावे या साठी डॉ. कैलास कानिंदे रेणापूरकर यांच्या प्रयत्नाला यश आले आहे . तालुक्यातील १० गावांचे सरपंचपद रिक्त होते ते तात्काळ भरण्याच्या संदर्भात वेळोवेळी निवडणूक अधिकाऱ्यांना निवेदन देवून आरक्षण  निश्चित करण्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा करुन यश संपादन करणारे बहुजन समाज पार्टीचे नांदेड जिल्हा सचिव तथा भोकर विधानसभा प्रभारी, मानवाधिकार सहायता संघाचे भोकर तालुका कार्यकारी अध्यक्ष उच्चशिक्षित डॉ. कैलास कानिंदे रेणापूरकर ग्रामपंचायत सदस्य रेणापूर यांना श्रेय जाते.
            गेल्या अनेक दिवसापासून म्हणजेच जवळपास पावणेदोन वर्षे सरंपचा ऐवजी उपसरपंच यांनी गावगाड्याचा कारभार असंविधानिकपणे पार पाडला आहे. त्याला निवडणूक आयोगाने अखेर पावबंद करून सरंपचाची निवड जाहीर करून गावगाड्याचा कारभार सरपंचाच्या हाती देण्याचा अखेर मुहूर्त सापडला आहे.  भोकर तालुक्यातील रेणापूर, जाकापूर, धारजनी, धावरी ( खु ), रावणगाव, दिवशी ( खु ), हस्सापूर, सायाळ , किन्हाळा / बटाळा, कोळगांव ( खु ) या दहा गावच्या रिक्त सरपंच पदाची आरक्षण सोडतीचा अखेर मुहुर्त निघाला. त्यावर निवडणूक प्राधिकृत अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी तथा तहसीलदार  राजेश लांडगे यांनी शिक्कामोर्तब केले आहे.भोकर तालुक्यात मंगळवार २७ सप्टेंबर रोजी सरपंच निवड कार्यक्रम राबवण्याचे आदेश दिलेत. यामुळे तालुक्यातील १० गावाच्या गावकऱ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला . आता मंगळवारी सरपंच आरक्षण निवडीचा गुलाल उधळणार असल्याने याची उत्सुकता ग्रामीण भागात लागून राहिली आहे.


सरपंच पदावरील उच्च शिक्षित व्यक्तीच गावाचा विकास घडवुन आणून दिशा देऊ शकतो  - डॉ . कैलास कानिंदे रेणापुरकर

निवडणूक आयोगाने सरपंच पदासाठी शिक्षण पदवी अनिवार्य करावे. कारण उच्च शिक्षणामुळे ग्राम विकासात होत असलेल्या भ्रष्टाचाराला आळा बसेल व विकास कामे मार्गी लागतील. पण प्राथमिक व माध्यमिक अर्धवट शिक्षण घेऊन सरपंच पद चालवित आहेत. त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार? म्हणून ग्रामविकासाची कामे परिपूर्ण झाल्याचे दिसत नाही ग्रामविकास करण्यापेक्षा 5%, 10% कसे प्राप्त होतील याकडेच लक्ष केंद्रित झाल्याचे दिसते. म्हणून ग्रामविकासाची कामे निकृष्ट दर्जाची होत आहेत. म्हणजेच ग्रामपंचायतीच्या कारभारात भ्रष्टाचाराला जोर पोहचत आहे .म्हणून समाज विकासासाठी सरपंच पदावरील व्यक्ती उच्च शिक्षितच असावा. कारण सरपंच पदावरील उच्च शिक्षित व्यक्तीच गावाचा विकास घडवुन आणून दिशा देऊ शकतो अशा स्वरूपाच्या भावना डॉ. कैलास कानिंदे यांनी 'निवेदक न्यूज'शी बोलतांना व्यक्त केल्या.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News