माणूस जिवंतच नसेल तर? त्याला कोणती गरज भासेल...? याचा विचार करायला लावणारा चित्रपट म्हणजे "गैरी...” - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Saturday, November 12, 2022

माणूस जिवंतच नसेल तर? त्याला कोणती गरज भासेल...? याचा विचार करायला लावणारा चित्रपट म्हणजे "गैरी...”

 



         अन्न, वस्त्र आणि निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत पण त्या गरजा माणूस जिवंत असेल तर आहेत.... माणूस जिवंतच नसेल तर? त्याला कोणती गरज भासेल...? याचा विचार करायला लावणारा चित्रपट म्हणजे "गैरी...” 

       अभिनेता मयुरेश पेम आणि अभिनेत्री नम्रता गायकवाड या नव्या जोडीची केमिस्ट्री "गैरी" या चित्रपटातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. दमदार स्टारकास्ट असलेला हा चित्रपट येत्या १६ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर लाँच करण्यात आले आहे.


         युक्ता प्रॉडक्शन्स आणि द्विजराज फिल्म्सचे निर्माते प्रवीण बालाप्रसादजी बियाणी, दत्तात्रय जाधव यांची निर्मिती असलेल्या "गैरी" या चित्रपटाचं लेखन, दिग्दर्शन पांडुरंग बाबुराव जाधव यांनी केलं आहे. मयूरेश पेम, नम्रता गायकवाड, प्रणव रावराणे, आनंद इंगळे, केतन पवार, समीर खांडेकर, सुनील देव, कृतिका गायकवाड, देविका दफ्तरदार यांच्या चित्रपटांत भूमिका आहेत. गुरु ठाकूर आणि विष्णु थोरे यांनी गीत लेखन, अमितराज यांनी संगीत दिग्दर्शन, फुलवा खामकर यांनी नृत्य दिग्दर्शन केलं आहे. वैशाली सामंत, अमितराज, मधुरा कुंभार, हृषिकेश शेलार यांनी गाणी गायली आहेत. तर पार्श्व संगीत आणि संगीत मयूरेश केळकर यांचं आहे. विनोद पाटील यांचं छायालेखन आहे. स्वतःच्या समाजाला वाचवण्यासाठी डॉक्टर होऊ पाहणाऱ्या तरुणाला येणाऱ्या समस्या "गैरी" हा चित्रपट मांडतो. सकस कथा, दमदार स्टारकास्ट असलेल्या या चित्रपटाविषयी आता उत्सुकता निर्माण झाली आहे.


          गैरी चित्रपटाच्या सर्व टीमला खूप खूप शुभेच्छा अभिमान वाटतो लेखक-दिग्दर्शक हे नांदेडचे पांडुरंग आहेत. यांच्या गैरी चित्रपटाची गीते झी म्युझिकने घेतली आहेत.


   अनुपमा बनच्या अभिनयाने साकारलेला

'गैरी'



 

        माळरानावर पाली टाकून  आपला उदरनिर्वाह करणारा, शिक्षण, आरोग्य, यापासून अजूनही दूर असलेला, लोकांच्या विश्वासाला पात्र नसलेला, अनंत अडचणींना तोंड देऊन जगत राहणारा व भटकंती हा समाज. पालीवर (वस्ती) आरोग्यासाठी होणारी हेळसांड पाहून  आपल्या समस्या आपणच सोडवावे या ध्येयाने प्रेरित होऊन मुख्य नायक आपल्या समाजातील लोकांना येणाऱ्या अडचणी सोडवण्याच्या हेतूने डॉक्टर होण्याचे ध्येय ठेवतो, एम.बी.बी.एस. च्या शिक्षणासाठी प्रवेश मिळवतो आणि मग जो प्रवास सुरु होतो तो रोमांचक, रहस्यमय, विनोदी शैलीत समाजाच्या विचारांना दिशा देणारा आहे. गैरी, चित्रपटाची कथा नांदेड जिल्ह्यातील जि. प. शिक्षक  पांडुरंग जाधव यांच्या लेखणीतून साकार झालेली आहे. चित्रपटाचे निर्माते कोलंबीचे भूमिपुत्र  प्रविणजी बियाणी आणि दत्तात्रय जाधव आहेत.

       या चित्रपटात मुख्य नायकाच्या आईच्या भूमिकेत अनुपमा साईनाथ बन -पुलचवाड (प्रा. शिक्षिका  जि. प. कें. प्रा. शा. कोलंबी ता.नायगाव जि नांदेड) आहेत. सौन्दर्य आणि अभिनय याची जन्मजात देणगी लाभलेल्या अनुपमा साईनाथ बन  यांनी  आपल्या शिक्षकी पेशा सोबत आपला आवडीचा  अभिनय  छंद जोपासला. महेश कोठारे दिग्दर्शक असलेल्या *पाणी*  या चित्रपटातही आदिनाथ कोठारे सोबत अनुपमानी भूमिका साकारली आहे. दि 16 डिसेंबर 2022 रोजी प्रदर्शित होत असलेला *गैरी* चित्रपट आपण सर्वांनी आवर्जून पहावा.

     

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News