कोरोना विषाणू ( कोव्हीड 19 ) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सहायक जिल्हाधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली उपविभाग किनवट सज्ज - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Tuesday, March 17, 2020

कोरोना विषाणू ( कोव्हीड 19 ) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सहायक जिल्हाधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली उपविभाग किनवट सज्ज



किनवट  :
येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात सोमवारी ( दि. 16 ) कोरोना विषाणू ( कोव्हीड 19 ) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी किनवट व माहूर तालुक्यातील प्रतिबंधात्मक उपाययोजना करणेच्या अनुषंगाने सहायक जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांचे मार्गदर्शनाखाली किनवटचे तहसिलदार नरेंद्र देशमुख यांचे उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली. 
              सदरील बैठकीत दोन्ही तालुक्यातील महसूल , गटविकास अधिकारी , आरोग्य , शिक्षण , नगरपालीक , पोलिस , आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय,आश्रम शाळा यंत्रणा प्रमुखासह इतरही यंत्रणा प्रमुख हजर होते . जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांचे आदेशानुसार किनवट व माहूर तालुक्यात 50 कोरोन्टाईन (Quarantine )  आणि 20 आयसोलेशन (isolation )  बेडसाठी जागा निश्चीत करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली .
              त्याचबरोबर पुढील प्रमाणे सदरील बैठकीत चर्चा करण्यात आली. सर्व औषधालयात विक्री होत असलेल्या मास्क , सॅनीटॉयझर , हॅन्ड वॉश व ईतर आवश्यक वस्तू ह्या वाजवी किंमतीत विक्री करण्यात याव्यात. तसेच अवाजवी किंमतीत विक्री करणारे औषधालय यांचे वर आवश्यक वस्तू कायदा 1955 तसेच आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 अन्वये कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. सर्व शहरी व ग्रामीण भागातील सरकारी / निमसरकारी शाळा , संस्था ह्या 31 मार्च 2020 पर्यत बंद ठेवण्या बाबत निर्देश देण्यात आले .  गर्दी होणार नाही या अनुषंगाने सामाजिक , राजकिय , धार्मीक व ईतर कार्यक्रम ज्यामुळे गर्दी होईल असे कार्यक्रम 31 मार्च 2020 पर्यत रद्द करणे बाबत पोलिस यंत्रेचे प्रमूख यांना निर्देश देण्यात आलेत .  चित्रपटगृह , मॉल , तरणतलाव , व्यायामशाळा , आठवडी बाजार हे 31 मार्च 2020 पर्यत बंद ठेवण्यात यावे या बाबत गटविकास अधिकारी किनवट व मुख्याधिकारी नगर पालिका किनवट यांना निर्देश देण्यात आलेले आहेत .  आवश्यक त्या वस्तु / साहित्य मागणी करणे बाबत तालुका आरोग्य अधिकारी  व वैद्यकिय आधिकारी यांना निर्देशीत करण्यात आले . जनजागृतीसाठी बॅनर , ऑडीओ क्लीप , फिरते प्रचार रिक्षा व प्रत्येक गावात अशा वर्कर, सेवाभावी संस्था व कमर्चारी यांचे मार्फत जनजागृती करणे बाबत निर्देशित केले आहे .
               जनतेस याव्दारे असे अवाहन करण्यात येते की , जनजागृतीच्या माध्यमातून कोरोना विषाणू ( कोव्हीड 19 ) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व प्रकरची काळजी घेण्यात यावी , गर्दी टाळणे , बाहेर पडताना तोंडास रुमाल बांधणे , वेळोवेळी हात धुणे , परीसर स्वच्छ ठेवणे याबाबत प्रत्येकांनी सजग रहावे असे आवाहन तहसिलदार नरेंद्र देशमुख यांनी केले.
                

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News