कोरोनाशी लढतांना उपविभागीय दंडाधिकारी देवदत्ता रे आयुष्याची लढाई हरल्या - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Thursday, July 16, 2020

कोरोनाशी लढतांना उपविभागीय दंडाधिकारी देवदत्ता रे आयुष्याची लढाई हरल्या



कोलकत्ता : कोरोनाविरोधातील लढाईत महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या पश्चिम बंगालमधील महिला अधिकाऱ्याचा कोरोनाचा संसर्ग झाल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. देवदत्ता रे असं या महिला अधिकाऱ्याचं नाव आहे. 
      हुगळी जिल्ह्यातील चंदननगर उपविभागाच्या उपविभागीय दंडाधिकारी म्हणून त्या कार्यरत होत्या. त्यांच्या मागे पती आणि चार महिन्यांचा मुलगा आहे.
३८ वर्षीय देवदत्ता रे यांना कोरोनाची लक्षणं दिसू लागल्यानंतर घरातच क्वारंटाइन होण्यास सांगण्यात आलं होतं. रविवारी त्यांची प्रकृती ढासळली असता रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण दुसऱ्या दिवशी सकाळी कोरोनाविरोधातील लढाईत त्यांना अपय़श आलं आणि निधन झालं.
              देवदत्ता रे यांच्यावर ट्रेनमधून बंगालमध्ये परतणाऱ्या परप्रांतीय मजुरांची जबाबदारी होती. बंगालमध्ये पोहोचल्यावर त्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्याची जबाबदारीही त्यांच्याकडे होती. माणुसकी आणि संवेदनशीलता दाखवत ज्या पद्धतीने त्यांनी परिस्थिती हाताळली होती त्याचं सर्वांकडून कौतुक केलं जात होतं. अशातच त्यांची जीवनज्योत मालवली  ! कोरोनाच्या लढाईत चोख कर्तव्य बजावणारी ही महिला अधिकारी आयुष्याची लढाई हरल्याबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. संवेदनशीलपणे कर्तव्य बजावणाऱ्या ह्या कोरोनायोध्यास सलाम !

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची आदरांजली


 मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आदरांजली व्यक्त करतांना ट्विटरवर असे लिहिले की, कोविड -19 मुळे  उप विभागीय दंडाधिकारी देवदत्ता रे यांचे निधन झाले आहे.  चंदननगरमध्ये त्या डेप्युटी मॅजिस्ट्रेट आणि डेप्युटी कलेक्टर म्हणून काम पाहात होत्या.  त्या कोविड -19 च्या  फ्रंटलाइन योद्धा देखील राहिल्या आहेत.  मी त्यांच्या कुटुंबियांबद्दल शोक व्यक्त करते.

 कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट एका आठवड्यापूर्वी आला होता

 कोविड -19 मुळे आणखी 24 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती पश्चिम बंगालच्या आरोग्य विभागाने दिली आहे.  त्याचवेळी हुगळी जिल्ह्यातील उप विभागीय दंडाधिकारी पदाच्या वरिष्ठ अधिकारी देवदत्ता रे यांचेही कोरोनाने निधन झाले.  गेल्या आठवड्यात 38 वर्षीय महिला अधिकारी कोरोनाव्हायरस पॉझिटिव्ह असल्याचे आढळले.  त्यांच्यावर श्रीरामपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.

 देवदत्ता रे अग्रणी योद्धा होत्या

 आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार देवदत्ता रे मध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे आढळली.  पूर्वी, त्यांना डम डम येथील घरीच होम क्वारेन्टाईन  रहाण्यास सांगितले गेले होते.  परंतु श्वासोच्छवासाच्या त्रासानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.  परप्रांतियांना हुगळी जिल्ह्यात आणण्याच्या मोहिमेच्या  देवदत्ता रे प्रमुख होत्या.


No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News