किनवट : किनवटमध्ये आज शुक्रवारी ( ता.31 ) रोजी रॅपिड ऍटिजेन टेस्ट द्वारे 4 अहवाल पॉझिटिव्ह आल्याने बाधित रूग्णांची संख्या वाढून आता संदर्भित 2 व येथील कोविड केअर सेंटरमध्ये 13 असे एकूण 15 रुग्ण उपचार घेत आहेत.
आज मोमीनपूरा किनवट येथील 33 वर्षाची 1 महिला, राजेंद्रनगर, किनवट येथील 31 वर्षाचा 1 व 63 वर्षाचा 1 असे 2 पुरुष आणि 73 वर्षाची 1 महिला असे एकूण 4 नवीन रूग्ण रेपिड एँटिजेन टेस्ट द्वारे केलल्या तपासणीत पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे राजेंद्रनगर क्षेत्र उपविभागीय अधिकारी महेश वडदकर यांनी आता कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर केले असून किनवट उपविभागात दररोज वाढणारी संख्या लक्षात घेऊन याला थोपविण्यासाठीच्या उपाय योजना करण्यासाठी किनवट व माहूर तालुक्यातील संबंधित अधिकाऱ्यांची शनिवारी (ता. 01 ऑगष्ट ) दुपारी 1 वाजता त्यांच्या दालनात बैठक आयोजित केली आहे.
कंटेन्मेंट झोनची तहसिलदार उत्तम कागणे, गटविकास अधिकारी सुभाष धनवे, गट शिक्षणाधिकारी सुभाष पवने, उप विभागीय पोलिस अधिकारी मंदार नाईक, पोलिस निरिक्षक मारोती थोरात, मुख्याधिकारी निलेश सुंकेवार यांनी पाहणी करून आवश्यक त्या सूचना दिल्या.
डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटर, उपजिल्हा रुग्णालय,गोकुंदा येथे 10, कोविड केअर सेंटर, किनवट येथे 3 व संदर्भित 2 अशा एकूण 15 रुग्णांवर औषधोपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. असे वैद्यकीय अधिक्षक डॉ. उत्तम धुमाळे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुरमुरे यांनी कळविले आहे.
किनवट तालुक्याची कोरोना विषयी संक्षिप्त माहिती पुढील प्रमाणे
दि. 31/07/2020 सायं. 07 वाजता
घेतलेले एकूण स्वॅब- 183,
निगेटिव्ह स्वॅब- 151,
आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 4
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 22,
स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या- 14
स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-1,
मृत्यू संख्या- निरंक,
रुग्णालयातून सुट्टी दिलेली एकूण संख्या- 7,
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-15,




No comments:
Post a Comment