242 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी 370 बाधितांची भर तर एका जणांचा मृत्यू - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Saturday, September 5, 2020

242 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी 370 बाधितांची भर तर एका जणांचा मृत्यू

  


 

नांदेड (जिमाका) दि. 5 :- शनिवार 5 सप्टेंबर 2020 रोजी सायं. 5.30  वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 242 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 370 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 79 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 291 बाधित आले.

 

आजच्या एकुण 1 हजार 625 अहवालापैकी  1 हजार 223 अहवाल निगेटिव्ह आले.  जिल्ह्यात एकुण  बाधितांची संख्या आता  हजार 582 एवढी झाली असून यातील  5  हजार 445 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे उपचारानंतर घरी सोडण्यात आलेल्या बाधित रुग्णांचे प्रमाणे 65.82 टक्के एवढे झाले आहे. एकुण 2 हजार 827 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 292 बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. 

 

या अहवालात आज शनिवार 5 सप्टेंबर रोजी प्रकाशनगर नांदेड येथील 58 वर्षाच्या एका पुरुषाचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे  उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 258 झाली आहे.

  

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथील 21, मुखेड कोविड केंअर सेंटर 16, नायगाव कोविड केंअर सेंटर 3, देगलूर जैनब कोविड केंअर सेंटर 5, कंधार कोविड केंअर सेंटर 3, बिलोली कोविड केंअर सेंटर 9, धर्माबाद कोविड केंअर सेंटर 10, पंजाब भवन कोविड केंअर सेंटर नांदेड 146, खाजगी रुग्णालय 4, किनवट कोविड केंअर सेंटर 15, मुखेड कोविड केंअर सेंटर 1, उमरी कोविड केंअर सेंटर 9 असे  बाधित व्यक्तींना 242 औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे

 

 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपाक्षेत्र 33, बिलोली तालुक्यात 1, भोकर 1, लोहा 2, नायगाव 4, माहूर 1, धर्माबाद 2, नांदेड ग्रामीण 3, अर्धापूर 1, देगलूर 19, मुखेड 6, कंधार 2, हिमायतनगर 1, यवतमाळ 3 असे एकुण 79 बाधित आढळले. 

 

तर अँटिजेन तपासणीद्वारे  नांदेड मनपा क्षेत्र 119, अर्धापूर तालुक्यात 8 मुखेड 30, किनवट 4, नायगाव 21, देगलूर 4, धर्माबाद 8, भोकर 3,  हिंगोली 3, अहमदनगर 1, बासर 1, नांदेड ग्रामीण 16, मुदखेड 9, बिलोली 7, लोहा 3, कंधार 10, हदगाव 8, माहूर 3, उमरी 30, लातूर 1, यवतमाळ 2 असे  एकुण 291 बाधित आढळले

 

जिल्ह्यात 2 हजार 827 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 249, एनआरआय व पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे 1 हजार 172, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल  नांदेड येथे 85, नायगाव कोविड केअर सेंटर येथे 68, बिलोली कोविड केअर सेंटर येथे 84, मुखेड कोविड केअर सेंटर येथे 146,  देगलूर जैनब कोविड केअर सेंटर येथे 67, लोहा कोविड केअर सेंटर येथे 113, हदगाव कोविड केअर सेंटर 64, भोकर कोविड केअर सेंटर 30,  कंधार कोविड केअर सेंटर येथे 37,  किनवट कोविड केअर सेंटर येथे 103, अर्धापूर कोविड केअर सेंटर येथे 43, मुदखेड कोविड केअर सेटर 11,  माहूर कोविड केअर सेंटर येथे 62, आयुर्वेदिक शासकिय रुग्णालय कोविड रुग्णालय सेंटर येथे 43, धर्माबाद कोविड केअर सेंटर येथे 56, उमरी कोविड केअर सेंटर 38, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 7, बारड कोविड केअर सेंटर 5खाजगी रुग्णालयात 318 बाधित, औरंगाबाद येथे संदर्भित 17, निजामाबाद येथे 2 बाधितमुंबई येथे 1 बाधित तर हैद्राबाद येथे 5 बाधित, लातूर येथे 1 बाधित  संदर्भित झाले आहेत.  

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 54 हजार 642,

निगेटिव्ह स्वॅब- 43 हजार 812,

आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 370,

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 8 हजार 582,

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-09,

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 15,

एकूण मृत्यू संख्या- 258,

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 5 हजार 445,

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 2 हजार 827,

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 518, 

आज रोजी गंभीर प्रकृती असलेले बाधित- 292. 

 

कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.   

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News