बँकाक (थायलंड) : गगन मलीक फाउंडेशन, त्रिरत्न सोसायटी थायलंड व श्रध्दा फाउंडेशन च्या वतीने वतीने येथे सुरू असलेल्या श्रामणेर दीक्षा समारंभात अभियंता भरतकुमार कानिंदे यांच्यासह 47 भारतीय उपासक सहभागी झाले आहेत.
येथील वे वेट राॅयल बुद्ध विहारात गुरुवारी (ता. 21 डिसेंबर 2023 ) सुरु झालेल्या श्रामणेर दीक्षा शिबीरात 47 भारतीयांनी एक महिण्याच्या कालावधी साठी परिव्रजा ग्रहण केली आहे. या कार्यक्रमात थायलंड मधील वरिष्ठ बौद्ध धम्म गुरू, देशातील मंत्री, सैन्य दलातील प्रमुख व भारतीय दूतावासातील प्रमुख हे जातीने हजर होते.
भारतातील एकूण शंभर सदस्यांनी या मध्ये सहभाग नोंदवला आहे. यात प्रामुख्याने सिने अभिनेता गगन मलीक, डॉ. सिद्धार्थ हत्तीअंबिरे, अभियंता भरतकुमार कानिंदे, मोहनराव वाकोडे, विनयपप्रिय डोंगरे, विकास तायडे व इतर मान्यवरांचा सहभाग आहे.
याच अनुषंगाने जागतिक शांतता रॅलीचे आयोजन करण्यात आले असून ही रॅली थायलंडच्या महत्त्वाच्या विविध शहरातून जाणार आहे.





No comments:
Post a Comment