*मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना ई-केवायसी करण्याचे आवाहन* - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Thursday, September 25, 2025

*मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना ई-केवायसी करण्याचे आवाहन*



 

नांदेड : जिल्ह्यातील मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला लाभार्थ्यांनी वेबपोर्टल http://ladakibahin.maharashtra.gov.in वर प्रत्यक्षात ई-केवायसीची कार्यवाही करावी, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसंदर्भात आधार अधिनियम 2016 च्या कलम 7 मधील तरतुदींच्या अनुषंगाने शासन अधिसुचनेनुसार, मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेंअंतर्गत लाभ घेण्यास पात्र असलेली व्यक्ती आधार क्रमांक बाळगत असल्याचा पुरावा सादर करेल किंवा आधार अधिप्रमाणन करेल असे नमुद केले आहे. राज्य मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार दरवर्षी जून महिन्यात या योजनेतील लाभार्थ्यांचे ईकेवायसी ekyc करावयाचे आहे.

 

लाडकी बहीण या योजनेचे त्याअनुषंगाने मुख्यमंत्री-माझी वेब पोर्टल http://ladakibahin.maharashtra.gov.in या वर सदरची e-KYC ची सुविधा शासनाने उपलब्ध करुन दिलेली आहे. ही प्रक्रिया मोबाईल वरुनही सोप्या पध्दतीने करता येते. सदर प्रक्रिया अत्यंत सोपी असून सहज व सुलभ असून महिला स्वतःचे मोबाईलवरूनही ही प्रक्रीया पुर्ण करु शकतील अशी प्रणाली शासनाने विकसित केली आहे.

 

त्यानुसार या वेब पोर्टलवर स्वतः लाभार्थ्यांना प्रत्यक्षात e-KYC बाबत करावयाची कार्यवाहीची सविस्तर तपशिल यासोबत देण्यात आला आहे. त्यानुसार सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थीनी e-KYC चालू अर्थिक वर्षात संबंधित महाराष्ट्र शासन परिपत्रक 18 सप्टेंबर 2025 या दिनांकापासुन 2 महिन्यांच्या आत पुर्ण करणे बंधनकारक आहे. या कालावधीत ज्या लाभार्थ्यांनी Aadhar Authentication केले नाही ते पुढील कार्यवाहीस पात्र राहतील याची नोंद घ्यावी.

 

या योजने अंतर्गत दरवर्षी जुन महिन्यापासुन 2 महिन्यांच्या कालावधीत या योजनेतील लाभार्थ्यांनी e-KYC करणे बंधनकारक राहील. अशा सुचना शासन परिपत्रक 18 सप्टेंबर 2025 अन्वये शासनाने दिलेल्या आहेत. महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभागाचे परिपत्रक 18 सप्टेंबर 2025 मधील निर्देशानुसार मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण या योजनेच्या लाभार्थ्यांनी माहितीच्या फ्लोचार्ट नुसार वेब पोर्टल वर http://ladakibahin.maharashtra.gov.in या वर प्रत्यक्षात e-KYC बाबत कार्यवाही करण्याचे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी नांदेड यांनी केले आहे.


No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News