तहसीलदार डॉ. शारदा चौंडेकर यांनी 3147 शिधापत्रिका धारक शेतकऱ्यांच्या खात्यावर 4 कोटी जमा करून दिला आर्थिक दिलासा - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Thursday, April 2, 2026

तहसीलदार डॉ. शारदा चौंडेकर यांनी 3147 शिधापत्रिका धारक शेतकऱ्यांच्या खात्यावर 4 कोटी जमा करून दिला आर्थिक दिलासा

 





 किनवट : येथील तहसीलदार डॉ. शारदा चौंडेकर यांनी तालुक्यातील 158 गावातील 3147 शिधापत्रिकाधारक शेतकरी लाभार्थ्यांच्या खात्यावर चार कोटी पाच लाख तेवीस हजार सत्त्याहत्तर रुपये जमा केल्याने शासकीय योजनांचा आर्थिक दिलासा मिळाल्याबद्दल सर्वत्र समाधान व्यक्त केल्या जात आहे.

     तालुक्यातील 158 गावांतील एकूण शेतकरी लाभार्थी शिधापत्रिका 3147 त्यावरील लाभार्थी संख्या 11597 असलेल्या शिधापत्रिका कार्डधारकांना शासनाकडून मंजूर करण्यात आलेली रक्कम त्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत एकूण ₹4,05,23,077/- (रुपये चार कोटी पाच लाख तेवीस हजार सत्त्याहत्तर फक्त) इतकी रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे.

          तहसीलदार डॉ. शारदा चौंडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुरवठा विभागाचे निरीक्षण अधिकारी निलेश राठोड, पुरवठा निरीक्षक सतीश सरनायक , मन्मथ मुगटकर, महेश चांदेकर , श्रीकांत ठाकरे व विनोद सोनकांबळे यांच्या संयुक्त प्रयत्नातून माहे एप्रिल 2024 ते डिसेंबर 2025 या कालावधीत (एकूण 21 महिने) तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागामार्फत महत्त्वपूर्ण कार्यवाही करण्यात आली आहे.

        या कार्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी व पात्र लाभार्थ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला असून शासनाच्या योजनांचा लाभ पारदर्शक व प्रभावी पद्धतीने पोहोचविण्यात आला असल्याने सर्वत्र समाधान व्यक्त केले आहे.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News